विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही दौऱ्यात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची आणि पोलिसी मानवंदना देण्याची प्रथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आज बंद करून टाकली. तसे आदेश फडणवीसांनी विविध मंत्रालयांना आणि जिल्हा प्रशासनांना पाठवून दिले.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठल्याही जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यावर गेल्यानंतर तिथे जिल्हा मुख्यालय किंवा अगदी तालुका मुख्यालयावर स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन अधिकाऱ्यांची रांग लागायची. त्यानंतर पोलीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मानवंदना द्यायचे. ही प्रथा मुख्यमंत्री पदाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी देखील चालू ठेवली होती. अनेकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र दौऱ्यावर जायचे, तेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पोलीस मानवंदना द्यायचे. त्याचे फोटो सगळीकडे प्रसिद्धीला पाठवले जायचे.
मात्र आता राजवट बदलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुठल्याही शासकीय दौऱ्यात कुठल्याही अधिकाऱ्याने पुष्पगुच्छ घेऊन स्वागताला येऊ नये. त्याचबरोबर पोलिसांनी मानवंदना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्व जिल्हा प्रशासनांना पाठवले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबरच अन्य मंत्र्यांचीही शासकीय बडदास्त आणि शाही स्वागत बंद होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App