विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ विकसन करणे या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही विशेष सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजनही केले.Chief Minister and Deputy Chief Minister lay the foundation stone of Ramkal Path in Nashik; Inauguration of the new building of Zilla Parishad
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात काही चुका झाल्या तर साधुसंतांनी आमच्या चुका पोटात घालाव्यात. आम्हाला सुधारून घ्यावे. सूचना कराव्यात, असे आवाहन असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)च्या ‘रुट्स ऑफ चेंज – नाशिकच्या ग्रामीण महिला उद्योजिकांच्या यशोगाथा’ या मासिकाचेही प्रकाशन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App