अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. भुजबळ यांच्याविरोधातील न्यायालयातील तक्रार मागे घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप केला जात आहे.Chhota Rajan threatens Shiv Sena MLA to withdraw complaint against Chhagan Bhujbal Shiv Sena-NCP dispute erupts in Nashik district
विशेष प्रतिनिधी
नाशिक : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. भुजबळ यांच्याविरोधातील न्यायालयातील तक्रार मागे घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून हा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात कोर्टात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या माणसांनी धमकावल्याची तक्रार आमदार कांदे यांनी नाशिक पोलिसांत केली आहे.
निधी गैरव्यवहार प्रकरणी कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार हा खटला मागे घ्यावा यासाठी छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे याने आमदार कांदेंना फोन केला होता. हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, अशी धमकी दिल्याची तक्रार आमदार कांदेंनी नाशिक पोलिसांना केली असून ज्या नंबरवरुन आपल्याला धमकीचा फोन आला तो नंबरही कांदे यांनी पोलिसांना दिला आहे. आमदार कांदे यांच्या कार्यालयातूद पोलीस आयुक्तांना पत्र दिले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App