अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू छोटा राजनची ३८ वर्षांनी एका खटल्यातून निर्दोष सुटका, हे होते प्रकरण

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कुप्रसिद्ध गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ ​​छोटा राजन याला ३८ वर्षांनंतर एका खटल्यातून निर्दोष मुक्त केले. मुंबई अंडरवर्ल्डमधील डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या छोटा राजनच्या गुन्हेगारी जीवनातील हा पहिला एफआयआर होता, ज्यामध्ये 1983 मध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर खुनी हल्ल्याचा आरोप होता. Chhota Rajan the biggest enemy of underworld don Dawood Ibrahim, acquitted in a case after 38 years


वृत्तसंस्था

मुंबई : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कुप्रसिद्ध गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ ​​छोटा राजन याला ३८ वर्षांनंतर एका खटल्यातून निर्दोष मुक्त केले. मुंबई अंडरवर्ल्डमधील डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या छोटा राजनच्या गुन्हेगारी जीवनातील हा पहिला एफआयआर होता, ज्यामध्ये 1983 मध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर खुनी हल्ल्याचा आरोप होता.

दारूची तस्करी

याप्रकरणी छोटा राजनचे बाजू मांडणारे वकील तुषार खंदारे यांनी सांगितले की, 1983 मध्ये टिळक नगर पोलीस स्टेशनच्या पथकाने छोटा राजनला रोखण्याचा प्रयत्न केला होता, जेव्हा टॅक्सीमधून दारूची तस्करी होत होती. या पोलीस पथकात दोन अधिकारी आणि 4 हवालदार होते, तर राजनसोबत कारमध्ये अन्य दोन साथीदार होते. पोलिसांनी टॅक्सी थांबवली असता छोटा राजनने चाकू काढून एका पोलीस अधिकाऱ्याला जखमी केले.

पोलिसांनी छोटा राजन आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती, तर एक साथीदार पळून गेला होता. छोटा राजनसोबत अटक करण्यात आलेल्या त्याच्या साथीदाराची नंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती, मात्र राजनविरुद्धचा खटला अजूनही सुरू होता.



2015 मध्ये सीबीआयकडे प्रकरण

इंडोनेशियामध्ये अटक केल्यानंतर छोटा राजनला ऑक्टोबर 2015 मध्ये भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी छोटा राजनवर दाखल झालेला हा गुन्हा सीबीआयकडे सोपवला. या प्रकरणात अंतिम क्लोजर रिपोर्ट ठेवताना सीबीआयने म्हटले होते की, खूप जुने प्रकरण असल्याने त्यांना साक्षीदार मिळत नाहीत. हल्ल्यात वापरलेला चाकूही गायब झाला आहे.

साक्षीदार हजर करण्यात अपयश

राजनचे वकील खंदारे यांनी युक्तिवाद केला की, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयाजवळ अत्यंत गजबजलेले ठिकाण असूनही या घटनेचा एकही स्वतंत्र साक्षीदार हजर करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. राजन याचा या प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सीबीआयचे विशेष न्यायाधीश एटी वानखेडे यांनी गुरुवारी छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली. सीआरपीसीच्या कलम २३५(१) अंतर्गत न्यायाधीशांनी छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली.

Chhota Rajan the biggest enemy of underworld don Dawood Ibrahim, acquitted in a case after 38 years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात