विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijaykumar Ghadge छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीचा जाब थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्याचा निर्णय घेतला आहे. “मी काय चूक केली? मी कुणाला वाईट बोललो का? जर काही चूक झाली असेल, तर त्यांनीच मला समोर सांगावं, असे सांगत ते लातूर येथी रुग्णालयातून थेट मुंबईला निघाले आहेत. Vijaykumar Ghadge
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली होती. याबाबत बोलताना घाडगे म्हणाले, सुरज चव्हाण याने माझ्यावर प्राण घातक हल्ला केला. पोलिसांचा जावई असल्यासारखा तो येतो काय आणि जमीन घेऊन जातो काय, सगळंच वाईट आहे. विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर याबाबत कारवाई होत नाही. मात्र सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन देणाऱ्या माझ्यासारख्या शेतकरी कार्यकर्त्यावर प्राण घातक हल्ला होतो. हे योग्य नाही. यामुळे मी आत थेट मुंबईकडे निघालो आहे. अजित पवार यांनाच मी याबाबत जाब विचारणार . सुनील तटकरे हे दादाला भेटताना समोर यावेत. मी काय वाईट वागलो ते त्यांनी तिथे सांगावं. Vijaykumar Ghadge
विजयकुमार घाडगे यांना रविवारी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन दिल्या कारणाने त्यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी सुरज चव्हाण यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यातील नऊ लोकांना ताब्यात घेत कारवाई करून सोडून देण्यात आलं. अवघ्या दोन तासांमध्ये हे सगळे बाहेर पडले. यामुळे छावा संघटनेतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
घाडगे यांच्याकडे अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराची सर्व साधने काढत त्यांनी स्वीट ॲम्बुलन्समध्ये बसून मुंबईकडे प्रयाण केला आहे. मराठवाड्यातील अनेक भागातील आलेले पदाधिकारी त्याच्या सोबत निघाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App