SHIVAJI MAHARAJ : पुणेकर प्रसाद तारेंनी शोधलं छत्रपती शिवाजी महाराजांच अप्रकाशित चित्र ; फ्रान्समधील सॅव्ही कलेक्शनमध्ये मौल्यवान खजिना; पहा महाराजांचे हे खास फोटो ….

  • जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब.

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणेकरांनी पुन्हा एकदा जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाची बातमी समोर आणली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित चित्र पहिल्यांदाच जगासमोर आले आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांना फ्रान्समधील सॅव्ही कलेक्शनमध्ये हा मौल्यवान खजिना सापडला आहे.Chhatrapati Shivaji Maharaj : Punekar found Unpublished picture in Savvy Collection at France

हेच ते चित्र

काय आहे या चित्रात?

  • या चित्रात छत्रपती शिवरायांची करारी तसेच प्रसन्न अशी मुद्रा-डोक्यावर शिरोभूषण आणि तुरा-खांद्यावर शेला दिसत आहे.
  • हे चित्र शिवकालीन असून सतराव्या शतकातील गोवळकोंडा चित्रशैलीत चित्रित आहे.
  • या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीन ऐतिहासिक चित्रांचा शोध लागला होता. परदेशातील संग्रहालयांमध्ये महाराजांची ही चित्रे जतन करण्यात आली आहेत. दरम्यान, आता नव्याने अप्रकाशित चित्र समोर आले आहे.  
  • महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलून यावी, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास.
  • हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक, पुरातन, दुर्मीळ चित्रांचा आता शोध लागल्यानंतर आता अप्रकाशित चित्र समोर आले आहे.
  • जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतल्या म्युझियममध्ये ही चित्रे असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी समोर आणली आहे.
  • गोवळकोंडा शैलीतली ही चित्रे सतराव्या शतकातील आहेत.
  • दोन चित्रांवर पर्शियन आणि रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिले आहे.
  • या चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार, पायात मोजडी आहे.
  • कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी आणि गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे अलंकार दिसत आहेत.
  • करारी मुद्रा, बोलके डोळे आणि चेहऱ्यावरची स्मितहास्ययुक्त प्रसन्नता हे शिवाजी महाराजांचे खास वैशिष्ट्य या चित्रात दिसतंय.

Chhatrapati Shivaji Maharaj : Punekar found Unpublished picture in Savvy Collection at France

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात