राष्ट्र रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रबळ सशस्त्र सेना – नौसेना निर्माण; पंतप्रधान मोदींची आदरांजली

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबळ सशस्त्र सेना निर्माण करणे प्राधान्य दिले स्वराज्य निर्मिती करून त्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His courage and emphasis on good governance inspires us.

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनाचा आढावा घेतल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्ररक्षणासाठी प्रबळ सशस्त्र सेना निर्माण केली. सागरी आक्रमणाचा धोका ओळखून प्रबळ नौसेना निर्माण केली.



स्वराज्य निर्मितीनंतर जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना आखल्या. त्यांनी निर्माण केलेली पाण्याची व्यवस्था आजही आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यकर्ते म्हणून आमची सर्वांची सर्व भारतीयांची प्रेरणा आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे वीर होते महान योद्धा होते पण त्यापलीकडे देखील त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वव्यापी होते त्यांच्या आशीर्वादातूनच राज्यकर्त्यांना जनकल्याणाची प्रेरणा मिळते अशा भावनाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His courage and emphasis on good governance inspires us.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात