विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar बनावट आयएएस कल्पना भागवतचे अफगाणिस्तान-पाकिस्तान कनेक्शनचे धागेदोरे समोर येत आहेत. अफगाणी मित्र अशरफच्या भावाच्या पाकिस्तानातील रेस्टॉरंटसाठी कल्पनाने ३ लाख रुपये हवालामार्फत पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तेथून त्याने मित्राच्या मदतीने ती हवालामार्फत पाकमध्ये पोहोचवली.Chhatrapati Sambhajinagar
दोघांनी किती रक्कम फिरवली हे मात्र अद्याप गूढ आहे. कल्पनाच्या बँक खात्यात तब्बल ३२ लाखांचे व्यवहार झाले. शहरातील एका बिल्डरने तिला पैसे दिले होते. तसेच तिने दोन बड्या राजकीय नेत्यांकडेही पैशांची मागणी केल्याचे तपासात समोर आले. अशरफचा शोध सुरू असून त्याचे लोकेशन हरियाणात आढळल्यानंतर गुप्तचर यंत्रणेचे एक पथक तिकडे गेले आहे.Chhatrapati Sambhajinagar
अशरफने क्रेडिट कार्डने हॉटेलचे बिल भरले
अशरफ कल्पनाला भेटण्यासाठी एप्रिलनंतर अनेक वेळा शहरात आला होता. त्यावेळी हॉटेल अॅम्बेसेडरचे बिल त्याने क्रेडिट कार्डने भरले होते. तो एमटीडीसीमध्ये वास्तव्यास असायचा, असे तिने कबुलीजबाबात म्हटले आहे. मात्र, ती खाेटे बाेलत असून अशरफ ती थांबलेल्या हॉटेलातच भेटायला येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयबीच्या पथकाकडून चौकशी सुरू
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान कनेक्शन समोर आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आयबीच्या अधिकाऱ्यांनी सलग तीन दिवसांपासून सिडको पोलिस ठाण्यात तळ ठोकला आहे. तिची सातत्याने चौकशी केली जात आहे. कल्पनाच्या संशयास्पद हालचालीमुळे तिच्या बँक खात्याची माहिती मागवून घेतली. त्यात ३२ लाखांचे व्यवहार उघड झाले.
आबेदला अफगाणी मित्रामार्फत पाठवले पैसे
कल्पनाचा अफगाणिस्तानचा मित्र अशरफ खलील याचा भाऊ आबेद याचे पाकिस्तानमध्ये रेस्टॉरंट आहे. त्यावर पाक प्रशासनाने कारवाई केली. त्या वेळी त्याला मदतीसाठी कल्पनाने ३ लाख रुपये अशरफकडे दिले होते. त्याने दिल्लीतील अफगाणी मित्रामार्फत हवालाद्वारे पैसे पाकमध्ये पाठवले.
अनुत्तरित प्रश्न
कल्पना- अशरफने किती रकमेची हवालामार्फत देवाणघेवाण केली?कल्पनाच्या खात्यात ३२ लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. हॉटेलचे बिल वगळता २७ लाखांचे तिने काय केले? शहरातील बिल्डरांनी कल्पनाला पैसे नेमके कोणत्या कारणासाठी पाठवले? अशरफचे हरियाणात काय करत आहे?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App