मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल

विशेष प्रतिनिधी

नाशिक : तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार. वाटेल तेव्हा खाली आणणार. मी तुमच्या हातातला खेळणं आहे का? असा संतप्त सवाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

राज्य मंत्री मंडळात समावेश झाला नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिक येथे आले. पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर आगपाखड केली. भुजबळ म्हणाले, तुम्ही उठ म्हणाले की उठ आणि बस म्हणाले की बस हे ऐकणारा छगन भुजबळ मनुष्य नाही. आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडले. मी पण त्यांना जे घडले आहे ते सांगितलं.

भुजबळ म्हणाले, प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे अवहेलना केली त्याचा आहे. पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात. आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील मला वरुन निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते. एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झाले नाही. माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवट पर्यंत आग्रह धरला होता. मी 40 वर्षांपासून मी इथे आहे म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती, असे सांगून भुजबळ म्हणाले, मी लढलो. जिंकून आलो आणि आता मला जाण्यासाठी सांगत आहेत. प्रफुल पटेल हे समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्याशी बोलत आहेत.

Chhagan Bhujbal’s angry question

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात