विशेष प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांना संधी दिली नाही त्यामुळे ते चिडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून बंडाचा झेंडा फडकवला. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांभोवती गर्दी केली. भुजबळ यांनी मुंबई, नाशिक आणि येवल्यात शक्ती प्रदर्शन केले.
भुजबळांच्या नाराजीवर अजितदादांनी बारामती मधल्या सत्कार सभेत त्यांचे नाव न घेता भाष्य केले. मंत्रिमंडळात ज्यावेळी नावे दिली, त्यावेळी काही मान्यवरांना थांबायला सांगितलं. त्यावर काहींनी रोष व्यक्त केला, पण नव्यांनाही संधी दिली पाहिजे. जुन्यांना केंद्रात संधी देण्याचा विचार केला. ज्यांचा मानसन्मान करायचा तो करण्यामध्ये अजित पवार कुठेही तसूभरही कमी पडणार नाही, असे अजितदादा म्हणाले.
अजितदादांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे काढले. चारच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी मला लोकसभेला उभे राहायला सांगितले, पण नंतर लगेच थांबविले. त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणुका झाल्या तेव्हा देखील मला राज्यसभेवर पाठवायचा विचार झाला, पण तोही नंतर थांबाविला. त्यावेळी मला सांगितले तुमची राज्यात गरज आहे म्हणून मला विधानसभा निवडणूक लढवायला सांगितली. मी विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलो. मग आता एकदम राज्यातली माझी गरज संपली का??, असा परखड सवाल छगन भुजबळ यांनी अजितदादांना केला.
या सगळ्या राजकीय खेळींमधून छगन भुजबळ यांना आता राजकीय दृष्ट्या काही मिळूच द्यायचे नाही, असे अजित पवारांनी ठरविले असल्याचे समोर आले. दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रातले नाकारलेले राज्यमंत्रीपद छगन भुजबळ यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या आल्या, पण भुजबळांनी ते केंद्रातले राज्य मंत्रिपद नाकारले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App