विशेष प्रतिनिधी
शिर्डी : Chhagan Bhujbal राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असते. त्यातच, मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे नाराजीनाट्य उघडपणे पाहायला मिळाले आणि अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपली आरक्षण लढ्यासंदर्भातील स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.Chhagan Bhujbal
छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार मला काही बोलले नाहीत, मला बोलायचे असते तर ते थेट बोलले असते. मी अजित पवारांना स्पष्ट बोललो आहे, मी 35 वर्षांपासून समाजासाठी काम करतोय. मी शिवसेना त्याच कारणाने सोडली होती. ते काम मी कुठेही गेलो तरी चालूच राहणार, त्यास मला कुणाचेही बंधन नाही. मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, असे भुजबळ म्हणाले. ते शिर्डी येथे पत्रकारांशी बोलत होते.Chhagan Bhujbal
तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलात?
मनोज जरांगे यांनी अजित पवारांनी साप पाळले असल्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलात? त्याला काही काम धंदा नाही, त्याला शिक्षण आहे का? काही माहीत आहे का? मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला, 57 वर्षे झाले मला. मी मुंबईचा दोनदा महापौर झालो. मंडल आयोगामुळे कॉंग्रेसमध्ये गेलो, त्याला राजकारणात कोण कधी आले माहीत आहे का? 1991 साली मी कॅबिनेट मंत्री झालो, जे आज मंत्री आहेत तेव्हा कोणीही नव्हते, असा पलटवार भुजबळ यांनी केला आहे.
जरांगेंकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता?
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला इडब्लूएसचे आरक्षण दिल्यानंतर सर्व प्रश्न मिटले होते. मात्र, हा दारुवाले आणि वाळूवाल्यांचा लिडर, हा लढाया, मारामाऱ्या करायला लिडरशिप करतोय. देशातले वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झालाय. त्याला अक्कलच नाही, त्याच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला.
ओढाताण कमी झाली की आनंदाचा शिधा परत सुरू करू
दरम्यान, आनंदाचा शिधा सरकारने बंद केला आहे. यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा योजना बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांना साडे 31 हजार कोटींचे पॅकेज द्यावे लागले आहे. मागच्या वर्षीपासून 40-45 हजार कोटींची लाडकी बहीण योजना सुरू आहे. ओढाताण कमी झाली की आनंदाचा शिधा परत सुरू करू, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App