विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत ओबीसींचा कोर्टात अन् राजकारणातही विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्य एक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला.Chhagan Bhujbal,
छगन भुजबळ यांची काल बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा झाली. त्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. त्यात त्यांनी त्यांचा उल्लेख दलिंदर पाटील असा केला. शनिवारी सकाळी पुन्हा एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. तसेच आरक्षणाच्या लढ्यात ओबीसींचाच विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, तो (जरांगे) मला सातत्याने येवल्याचा अलीबाबा आदी वेगवेगळे शब्द वापरतो. त्यामुळे मी सुद्धा थोडी गंमत केली. तो सारखा बोलत राहील, मग मी त्याचे ऐकतच राहू का? म्हणून मी त्यांना तसे म्हणालो. आरक्षणाच्या लढ्याचा शेवट हाच राहील की, ओबीसी व भटक्या विमुक्तांचा विजय होईल. हा विजय कोर्टात होईल. तो राजकारणातही होईल.Chhagan Bhujbal,
तुम्हाला काय आजार झाला हे देवालाच माहिती
बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठी जाळपोळ झाली होती. तेव्हा काही निवडक लोकांची घरे जाळण्यात आली. मुस्लीम समाजाच्या लोकांनी मागच्या भिंतीवर चढून तेथील लोकांना वाचवले. अरे कारवाई तर तुझ्यावर (जरांगे) व्हायला हवी होती रे. ज्या पद्धतीने तू सांगतोस, जो आपल्या विरोधात जाईल त्यांना चोपून काढा, जे आपल्या विरोधात जातील त्यांचे सर्व उमेदवार पाडा, ते पाहता कारवाई तुझ्यावर झाली पाहिजे होती. तुम्ही मारामारीची भाषा करतात. आज आमच्या नाभिक समाजाच्या व इतर लहान-लहान समाजाच्या लोकांची तुम्ही डोकी फोडली.
नुकतेच तुमच्या लोकांनी आमच्या नवनाथ वाघमारेंची गाडी जाळली. लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. तुम्ही हॉस्पिटलमध्ये बसून कायदा हातात घेता. तुम्हाला काय आजार झाला देवालाची माहिती. पण तेथून तुम्ही प्रक्षोभक विधाने करता, असे छगन भुजबळ म्हणाले.
अवघ्या 10 तासांत कुणबी प्रमाणपत्र जारी
छगन भुजबळ यांनी यावेळी 2 सप्टेंबरच्या जीआरनंतर मराठा समाजातील लोकांना अवघ्या 10 तासांतच कुणबी प्रमाणपत्र जारी केले जात असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, एक कुणबी प्रमाणपत्र अवघ्या 10 तासांतच जारी करण्यात आले. या प्रकरणी 16-17 गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत. पण अधिकारी काहीच पाहत नाहीत. ते ज्याला पाहिजे, त्याला दिले जात आहे. हा काय प्रकार आहे? हा सर्व प्रकार नव्या जीआरमुळे होत आहे. या जीआरमुळे अधिकाऱ्यांना हे सर्वकाही फ्री झाल्याचे वाटत आहे. कुणी येतो व मी कुणबी असल्याचे सांगतो. त्याला सर्रासपणे प्रमाणपत्र दिले जात आहे.
इतर आदिवासी, दलित व ओबीसी समाजाला हे प्रमाणपत्र काढण्यासाठी 10-10 महिने लागतात. त्यांना आपली जात सिद्ध करण्यासाठी 50 वर्षांपूर्वींचे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले जाते. पण इथे अवघ्या 10 प्रमाणपत्र जारी केले जाते. हे सर्वकाही सरकारच्या नव्या जीआरमुळे होत आहे. प्रशासनातील अधिकारी प्रचंड दबावात आहेत, असे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्यावरही साधला निशाणा
छगन भुजबळांनी यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. मनोज जरांगेंच्या लोकांनी मागे बीड पेटवले. मी गेलो व सांगितले की, मी इथे तोंड उघडणार. मी तेव्हा मंत्रिमंडळाचा राजीनामाही देऊन आलो होतो. त्या बैठकीत वडेट्टीवारांसह सर्वच मंडळी होती. अतिशय जोरात ते बोलले. ते म्हणाले भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजुला राहूद्या, हा पिवळा झेंडा घेऊन आपण सर्वजण पुढे जाऊया आणि या ओबीसीला न्याय मिळवून देऊया. आम्हाला आनंद झाला. एखाद्या पक्षाचा नेता ओबीसींसाठी उत्साहाने भांडत असेल, तर मला आनंद होणे स्वाभाविकच आहे. त्यानंतर बाकीच्या सभा झाल्या. मग त्यांनी भूमिका बदलली, म्हणून मी त्यांना बोललो, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App