मराठा आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची महत्त्वाची चाल, ओबीसी नेत्यांची बोलवली बैठक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून १० टक्के कोटा द्यावा या मागणीने राज्यात पुन्हा एकदा सामाजिक गटांमध्ये तणाव निर्माण केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करत दबाव वाढवला असतानाच, ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

ही बैठक सोमवारी दुपारी ३ वाजता होणार असून समता परिषदेचे प्रतिनिधी, तसेच इतर ओबीसी संघटनांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या बैठकीतून ओबीसी समाजाची एकत्रित भूमिका ठरण्याची चिन्हे असून, राज्य सरकारलाही या चर्चेकडे लक्ष देऊन पाहावे लागणार आहे.



भुजबळ यांनी स्पष्ट केले की, “कालेलकर आयोग आणि मंडल आयोग या दोन्ही अहवालांत मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून मान्यता दिलेली नाही. मुख्यमंत्री किंवा सरकारला कोणत्याही समाजाला मनमानी पद्धतीने यादीत समाविष्ट करण्याचा अधिकार नाही; आयोगाच्या शिफारशींच्या आधारेच निर्णय होऊ शकतो.”

मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख मिळावी या मागणीवरूनही वाद पेटला असून, “उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की मराठा आणि कुणबी हे समान नाहीत,” असे स्मरण करून देत भुजबळांनी शरद पवार गटावर झालेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, जरांगे यांनी आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यांची मागणी मान्य झाल्यास मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल. परंतु यामुळे ओबीसी समाजाच्या अस्तित्वातील आरक्षणात मोठा गंड येईल, अशी चिंता ओबीसी संघटनांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या राजकारणात हा मुद्दा निर्णायक ठरणार असून, भुजबळांच्या बैठकीतून पुढे ओबीसी समाज कोणती आक्रमक रणनीती ठरवतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Chhagan Bhujbal important move in the backdrop of the Maratha reservation controversy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात