नाशकात गोडसे – भुजबळांची उमेदवारी अडकली सामाजिक स्तरावरील वादात!!

Chhagan bhujbal

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची उमेदवारी सामाजिक वादात अडकली आहे. एकीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालच्या मराठा समाजाने भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केला असतानाच, दुसरीकडे ब्राह्मण महासंघ आणि पुरोहित संघ यांनी घेतलेली भूमिका आता वादग्रस्त ठरली आहे. Chhagan bhujbal candidature in a fix not over political issues but social and caste issues

छगन भुजबळला उभा कराच, तो निवडून कसा येतो ते बघतोच!!, अशी एकेरी भाषा वापरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळांना आव्हान दिले आहे, त्याचवेळी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी परस्पर छगन भुजबळ यांना विरोध करून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा जाहीर केल्याने ब्राह्मण समाजात नाराजीचे पडसाद उमटले आहेत.

वास्तविक नाशिक मधला ब्राह्मण समाज सर्वसमावेशक भूमिका घेणारा असून कोणत्या एका विशिष्ट पक्षाला टार्गेट करण्यापेक्षा राष्ट्रवादी विचार आणि योग्य उमेदवार याच्या पाठीशी उभा राहत असल्याचा इतिहास आहे. असे असताना निवडणुकीच्या वादग्रस्त मुद्द्यांमध्ये कुठली तरी एकांगी भूमिका जाहीर करणे हे ब्राह्मण समाजाला मान्य होणारे नाही, असे नाशिक मधील ज्येष्ठ पुरोहित मुकुंद खोचे यांनी स्पष्ट केले. पुरोहित संघ केवळ मूठभर लोकांचे प्रतिनिधित्व करतो. तो संपूर्ण ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे पुरोहित संघाने जाहीर केलेली राजकीय भूमिका ही ठराविक लोकांपुरतीच मर्यादित आहे. संपूर्ण समाजाची ती प्रतिनिधित्व करणारी नाही, असेच यातून ध्वनीत होते. नाशिक मधील जैन, माहेश्वरी तसेच अन्य छोटे – मोठे व्यापारी समाज देखील भुजबळांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे.

 भाजपच्या नेतृत्वाचा होरा काय??

तिसरीकडे हेमंत गोडसे यांच्या विरोधात भाजपकडे अहवाल पोहोचला असल्याची बातमी आहे. त्याउलट छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर केली, तर ओबीसी समाजाची मते संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपकडे वळू शकतात, असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा होरा असल्याचे बोलले जाते. पण तशी फक्त चर्चाच आहे. त्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. उलट नाशिक मधले भाजपचे तिन्ही आमदार लोकसभेसाठी भाजपच्याच उमेदवारीसाठी यासाठी आग्रही आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी भाजपचीच असल्याने हे तीनही आमदार उघडपणे पक्ष विरोधी भूमिका घ्यायला तयार नाहीत. पण त्याचबरोबर कोणत्याही उमेदवाराचे नावही ते जाहीरपणे घेत नाहीत.

– दोघांत तिसरा, पण कोणाची उमेदवारी विसरा??

दरम्यानच्या काळात हेमंत गोडसेही नकोत आणि छगन भुजबळही नकोत, त्यापेक्षा नाशिक मधून वादग्रस्त नसलेले तिसरे नाव पुढे आणायचा काहींचा प्रयत्न समोर आला आहे. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. अजय बोरस्ते यांची राजकीय सुरुवात भाजपमधून झाली. परंतु, नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून महानगर प्रमुख म्हणून काम केले. त्यावेळी शिवसेना अखंड होती. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर अजय बोरस्ते सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच उभे राहिले होते. परंतु नंतर बोरस्ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आले. नाशिक मधला शिवसेनेचा एक गट आता अजय बोरस्ते यांचे नाव पुढे करत आहे.

– प्रचंड राजकीय प्रभाव, पण वाद सामाजिक

नाशिक मध्ये महायुतीतील तिन्ही घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्या तुलनेत उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची शक्ती कमी आहे. त्यातही काँग्रेस नावाच्या एकेकाळच्या सर्वांत बळकट पक्षाचा आता नाशिकमध्ये मागमूसही शिल्लक नाही.
या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचा नाशिकवर मोठा राजकीय प्रभाव असूनही लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी मात्र सामाजिक वादात अडकली आहे.

Chhagan bhujbal candidature in a fix not over political issues but social and caste issues

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात