विशेष प्रतिनिधी
नागपूर : Chandrashekhar Bawankule भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने जो बोगस मतदानाच्या विरोधात मोर्चा सुरू केला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आशिष शेलार यांनी लावलेला आरोप बरोबर आहे. मी सांगतो कामठीमध्ये, मालेगावमध्ये, सिल्लोडमध्ये, मी सांगतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये 600 मत कॉंग्रेस आणि एक मत भाजप. माझ्याकडे 75 बूथ कामठीमध्ये, त्यापैकी 65 बूथ अशी आहेत 600 मत कॉंग्रेस कॉंग्रेस, 8 मत भाजपला, 400 मत कॉंग्रेस 14 मत भाजप.Chandrashekhar Bawankule
महाविकास आघाडीने व्होट जिहाद केले
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लोकसभेत काही ठराविक बूथ म्हणजे आमच्यावर राग काढल्यासारखी बूथ आहेत. हिंदू धर्मीयांचे किंवा मागासवर्गीयांचे जे बूथ आहेत, या ठिकाणी हा राग दिसत नाही. पण एक प्रकारचा आमच्याबद्दलचा असा राग निर्माण करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरोधात आहोत. त्यामुळे व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने ठराविक धर्मात आणि समाजात केला आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पप्पू
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधींच्या भूमिकेत आहेत. मागे आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींचा पाढा वाचला. आता राहुल गांधीचे वर्तन स्वीकारले आदित्य ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी, त्यामुळे पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडले. महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधींचे लांगूलचालन करणारे, कॉंग्रेसचे लांगूलचालन करणारे, राहुल गांधींचे नक्षेकदमवर चालणारे लोक, हे खरे पप्पू आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे बेमौसम दौरा करत असतात. जेव्हा जायचे असते तेव्हा जात नाही. जेव्हा मंत्रालयात जायचे होते, तेव्हा गेले नाही. विधिमंडळात कधी आले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे जे काही चालते ते बेमौसमी चालते. त्यामुळे त्यांना बेमौसम करू द्या, आम्ही मौसममध्ये करतो, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App