प्रतिनिधी
कोल्हापूर – माझ्यावर घोटाळ्याचा आरोप करणारे किरीट सोमय्या हे फक्त साधन आहेत. यातले खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच आहेत, असा आरोप करणाऱ्या ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कायद्याची लढाई कायद्याने लढा… कोल्हापूरी चपलेने नव्हे, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला आहे.chandrakantdada patil targets hasan mushriff over 100 cr. fraud in sugar factories
किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भाजपचे फार मोठे षडयंत्र आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, की कायद्याची लढाई कायद्याने लढायची असते. कोल्हापूरी चपलेने नाही. ईडीला तोंड देणे कठीण आहे. तोंडाला फेस येईल. कारखान्यांमध्ये ज्या कंपन्यांमधून ९८ कोटी आले त्या कंपन्या कुठे आहेत यावर बोला.
त्या कंपन्यांनी कोलकातामधून सेनापती घोरपडे कारखान्यात कशी गुंतवणूक केली त्यावर तुम्ही बोला. त्यामुळे मी हसन मुश्रीफ यांना आवाहन करतो की शांत डोक्याने काम करा, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही. बाकीचे जिल्हेही येतात. सोलापूरमध्ये भाजपाचे २ आमदार होते ते आता ८ झालेत. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेले पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली. कोल्हापूर जिल्हापरिषद आमच्याकडे होती.
पण हे तीन पक्ष ५६ आमदारांवर मुख्यमंत्री, ५४ आमदारांवर उपमुख्यमंत्री आणि ४४ आमदारांवर महसूलमंत्री करणारे आहेत. पण यातूनच कोल्हापूर जिल्हा परिषद गेली, असे प्रत्युत्तर चंद्रकांतदादांनी हसन मुश्रीफांना दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App