पाटील म्हणाले की , नाना पटोले हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे.Chandrakant Patil gave orders to the workers, said – file a complaint against Nana Patel
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करणार होते, परंतु सुरक्षा व्यवस्थेतील मोठ्या त्रुटीमुळे ती रद्द करण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.अशा स्थितीत नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली तसेच त्यांनी या घटनेमागे देशाच्या गृहमंत्र्यांचा हात असल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला.
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की , नाना पटोले हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे. याचा आपण निषेध करतो आणि पटोले यांच्यावर कारवाईची मागणी करतो. पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आहे का याचा तपास करावा, अशीही आपली मागणी असल्याचं पाटील म्हणाले.
तसंच पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याची सूचना आपण भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App