चंद्रकांत खैरेंच्या हिटलिस्टवर संदीपान भुमरेंपाठोपाठ भागवत कराड! म्हणाले, डॉ. कराडांच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे!!

भुमरेंची भ्रष्टाचाराची प्रकरणं ८ जुलैला बाहेर काढणार असल्याचंही सांगितलं आहे.

विशेष प्रतिनिधी

छत्रपती  संभाजीनगर :  शिवसेना(ठाकरे गट) नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार  चंद्रकांत खैरे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे सर्वपरिचित आहेत. भाजपा-शिवसेना(ठाकरे गट) युती तुटल्यापासून ते सातत्याने भाजपा व शिवसेना(शिंदे गट) नेत्यांना लक्ष्य करताना दिसत आहेत. याशिवाय अनेकदा त्यांनी विविध मुद्य्यांवरून शिंदे-फडणवीस सरकार आणि मोदी सरकावरही टीका, टिप्पणी केली आहे. दरम्यान, आता खैरेंनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे. Chandrakant Khaires criticism of Bhagwat Karada after Sandipan Bhumre

‘’केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. वेळ आली की सर्व मी बाहेर काढीलच.’’, असा इशारा खैरे यांनी दिला आहे. तर, या अगोदर खैरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना कराड यांनी पक्षी मरताना जसे  पंखांची हालचाल करतो,त्याप्रमाणे चंद्रकांत खैरे संपलेले असून त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना शिवसेनेतही कोणी विचारत नव्हतं, पण त्यांच्या दोन गट झाल्याने खैरेंना जीवदान मिळालं. अंबादास दानवे त्यांच्या कितीतरी पुढे निघाले आहेत. असा  टोला कराड यांनी लगावला होता.

याशिवाय संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येस घडलेल्या दंगलीनंतर खैरेंनी फडणवीसांवर आरोप केले होते.  तेव्हाही कराड यांनी खैरेंना वैद्यकीय तपासणीची गरज आहे. खैरे जर दंगल प्रकरणी फडणवीसांवर आरोप करत असतील तर त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे, असं करडा यांनी म्हटलं होतं.

तर काही दिवसांपूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे हे वसुली बहाद्दर असल्याचे म्हटले होते. टक्केवारी घेणे हाच त्यांचा व्यवसाय  असल्याचा आरोप भुमरेंनी केला होता. त्यावर खैरेंनी प्रत्युत्तर देताना, संदीपान भुमरेंकडे वडिलोपार्जित केवळ चार एकर जमीन होती,  मात्र आता ७०० एकर जमीन कुठून  आली. मी काही लोकांच्या मुंड्या मोडत नाही, लोकांकडून पैसे घेत नाही. माझे  जे काम आहे ते मी करतो. संदीपा भुमरे, भागवत कराड यांच्या सगळ्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, वेळेवर मी त्या सर्व बाहेर काढणार आहे. संदीपान भुमरेंनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना पैठणची जनता माफ करणार नाही,  त्यांची  टक्केवरीचं प्रकरणं ८ जुलैला मी बाहेर काढणार. असं खैरेंनी म्हटलं आहे.

Chandrakant Khaires criticism of Bhagwat Karad after Sandipan Bhumre

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub