विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chandrakant Khaire शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात राजकीय युती निश्चित झाल्याचे संकेत ठाकरे गटाच्या नेत्याकडून मिळत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.Chandrakant Khaire
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे. नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये पावणेतीन तास चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळाले. आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मुहूर्त देखील सांगितला.Chandrakant Khaire
नेमके काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
चंद्रकांत खैरे म्हणाले, “जनतेला दोन भावांचे सरकार हवे आहे. मुंबई महापालिका निवडणीसह राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. त्यासाठी येत्या विजयादशमीपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसतील. हा एकत्र येण्याचा शुभमुहूर्त ठरला आहे.” चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान ठाकरे बंधुंच्या युतीमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
दरम्यान, ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा करतानाच चंद्रकांत खैरे यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. मुसळधार पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीवर त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. उद्या ते मोरारी बापू यांच्या दर्शनासाठी येत आहेत. धार्मिकता असायलाच हवी, पण प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसामुळे पूर्णता चिखल झाला आहे. पूर्णतः पिक उध्वस्त झालेले आहे. खूप पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. जिल्ह्यात एक प्रकारचा ओला दुष्काळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App