मराठी माध्यमांनी गेली कित्येक वर्षे उभी केलेली काकांची चाणक्यगिरी पुतण्याने अवघ्या एका भाषणात उध्वस्त करून टाकली. शरद पवारांच्या गेल्या कित्येक वर्षांच्या मुत्सद्देगिरीचे पितळ अजितदादांनी अवघ्या एका भाषणात उघडे पाडून टाकले. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पेक्षा जास्त आमदार जमवून अजितदादांनी पवारांकडून पक्ष खेचून घेतलाच, पण त्याचबरोबर पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचे पितळ उघडे पाडून त्यांच्या सन्मानाने निवृत्ती होण्याचा मार्ग देखील बंद करून टाकला. Chanakyagiri of the uncle was destroyed by the nephew
आपल्या राजकीय आयुष्यात शरद पवारांनी कसे “डबल गेमचे” राजकारण केले, कशी धरसोड वृत्ती दाखवली, आपल्याच सहकाऱ्यांना कसे तोंडावर पाडले, याचे इथ्यंभूत वर्णन, जे कट्टर पवार विरोधकाला अथवा भाजपलाही करता आले नसते, पुतण्या अजित पवारांनी करून पवारांचे सगळे राजकारणच आज उद्ध्वस्त करून टाकले.
शरद पवार गटाने भले वयाच्या 83 व्या वर्षी योद्धा निघाला अशी पोस्टरबाजी केली असेल पण 83 वर्षांच्या या योद्धाचे राजकारण कसे धरसोड वृत्तीच्या बजबजपुरीने रंगले आहे, याचे स्मरण अजितदादांनी एकापाठोपाठ एक उदाहरणे देत महाराष्ट्र समोर उघड केले.
शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात आपल्या राजकीय जीवनाचा आढावा घेतला, तो जेवढा रोचक ठरला, त्यापेक्षा अजितदादांचे आजचे दीड तासांचे भाषण कितीतरी रोचक ठरले.
राष्ट्रवादीत फूट पडल्याने विरोधकांना मोठा धक्का… सोनिया, ममता आणि नितीश यांची फोनवर शरद पवारांशी चर्चा
विश्वासघाती राजकारणाचे वर्णन
पवारांवर आत्तापर्यंत विश्वासघाताचे राजकारण खंजीर खुपसण्याचे राजकारण केले, असा अनेकांनी आरोप केला. तो आरोप खरा असल्याचे अजितदादांच्या आजच्या भाषणातून उघड झाले. पवारांच्या 1962 ते 2023 असा अक्षरशः तारीखवार आढावा अजितदादांनी भाषणात घेतला आणि पवारांनी वसंतदादांना कसे फसवले, राजीव गांधी बरोबर ते कसे गेले, नरसिंह रावांनी त्यांना केंद्रात कसे घेतले, मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर परत कसे पाठवले, पवारांनी सोनिया गांधींचा परकीयत्वाचा मुद्दा उकरून काढून काँग्रेस कशी फोडली, पुन्हा सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी काँग्रेसशी कसा घरोबा केला राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार निवडून येऊनही मुख्यमंत्रीपदाची संधी पवारांनी आपल्या धरसोड वृत्तीमुळे कशी गमावली, इतकेच नाही तर 2014, 2017 आणि 2019 मध्ये भाजप बरोबर सत्तेची संधी असताना पवारांनी शब्द कसे फिरवले, याचे ईत्यंभूत वर्णन अजितदादांनी केले!! पवारांच्या राजकीय चरित्राचा व्हिडिओच त्यांनी बनविला.
देशाच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणत्याही पुतण्याने कोणत्याही काकाचे जेवढे वाभाडे काढले नसतील, तेवढे वाभाडे अजितदादांनी आपल्या एका भाषणात काढून घेतले
अजित दादांचे राजकीय सार्वजनिक जीवन सुमारे 40 वर्षांचे आहे. त्या 40 वर्षांच्या इतिहासातले आजचे सर्वात महत्त्वाचे भाषण ठरले आणि ते भाषणही आपल्याच काकांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेण्यापेक्षा वाभाडे काढण्याचे ठरले.
मराठी माध्यमांचे पवार महिमामंडन उद्ध्वस्त
वसंतदादा पाटील, सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या सर्वांशी शरद पवारांनी विश्वासघाताचे राजकारण केले. पण मराठी माध्यमांनी या विश्वासघाताला नेहमीच पवारांच्या चाणक्यगिरीच्या नावाखाली रंगविले. पण आज हीच चाणक्यगिरी अजितदादांनी अवघ्या एका भाषणात उध्वस्त करून टाकली. काका आता थांबा हे म्हणायची वेळ शरद पवारांनी अजितदादांवर आणली.
भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्त करतात. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपने 75 व्या वर्षी निवृत्त केले. आता तुमचे वय 83 आहे. अजून किती काम करता??, आता थांबा. तरुणांना पुढे आणून त्यांना आशीर्वाद द्या, अशा शब्दात अजितदादांनी साष्टांग नमस्कार घालून शरद पवारांना विनंती केली. यातून त्यांनी पवारांचा सन्मानाने निवृत्त होण्याचा मार्गही उघडपणे बंद करून टाकला.
पवारांनी अनेकदा धरसोड वृत्ती दाखवल्याने राष्ट्रवादीचे किती नुकसान झाले हे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने एकदाच 72 आमदार निवडून आणले पण त्यानंतर आमदारांची संख्या सतत घटली, याकडे अजितदादांनी लक्ष वेधले. हे पवारांच्या राजकारणावरचे सर्वात कठोर भाष्य ठरले. पवारांनी आता वयाच्या 83 व्या वर्षी महाराष्ट्राचा दौरा आरंभला आहे. या दौऱ्यात जर पवार आमच्यावर काही आरोप करणार असतील तर आम्हाला उत्तरसभा घ्याव्या लागतील, असा अजितदादांनी पवारांबरोबरच सुप्रिया सुळे यांना देखील स्पष्ट इशारा देऊन टाकला.
आत्तापर्यंतच्या 40 वर्षांच्या आयुष्यात मी अनेक गोष्टी सहन केल्या. मला त्यांनी व्हिलन केले. तू कसा निवडून येतो हे बघतो असे ते म्हणाले. हे पण मी सहन केले. पण आता बस्स झाले. इथून पुढे सहन करणार नाही, असा इशारा अजितदादांनी शरद पवारांना दिला.
शरद पवारांनी राजकीय आत्मचरित्रात आपल्या राजकारणाचा पूर्ण आढावा घेतला. पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांनी एकाच भाषणात एकाच भाषणाचा जो व्हिडिओ काढला त्यातून पवारांच्या राजकीय जीवनाचे पुरते वाभाडे निघाले, हे आजच्या अजितदादांच्या भाषणाचे सार आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App