चाणक्य फेम अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते रामतीर्थावर गोदावरीची महाआरती!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : चाणक्य फेम अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते काल चैत्र वद्य प्रतिपदेच्या दिवशी रामतीर्थावर गोदावरीची महाआरती करण्यात आली. मनोज जोशी हे त्यांच्या चाणक्य महानाट्याच्या निमित्ताने नाशिक मध्ये आले होते. यावेळी त्यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी महाआरतीचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार करून मनोज जोशी आणि त्यांच्या टीमने रामतीर्थाला भेट दिली. मनोज जोशी यांच्या हस्ते द्विमुखी मारुतीजवळ रामतीर्थावर महाआरती करण्यात आली.Chanakya fame actor Manoj Joshi performs Maha Aarti of Godavari at Ramtirtha!!



यावेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उद्योजक धनंजय बेळे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सचिव मुकुंद खोचे आदींनी मनोज जोशी यांचे स्वागत केले. मुकुंद खोचे यांनी गोदावरी सेवा समितीच्या विविध उपक्रमांची माहिती मनोज जोशी यांना दिली. या उपक्रमांची मनोज जोशी यांनी प्रशंसा केली.

चाणक्य फेम मनोज जोशी यांची मराठी मनाला ओळख विविध मालिकांमधून झाली. त्यांची श्रीमंत बाजीराव पेशवे यांची भूमिका खूप गाजली. मनोज जोशी यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आर्य चाणक्य यांच्या जीवनावर आधारित महानाट्याची निर्मिती केली. या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी रामतीर्थावर गोदावरी महाआरतीचा दिव्य अनुभव त्यांनी आणि त्यांच्या टीमने घेतला.

Chanakya fame actor Manoj Joshi performs Maha Aarti of Godavari at Ramtirtha!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात