Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाला छगन भुजबळ न्यायालयात आव्हान देणार; कागदपत्रांची पडताळणी सुरू

Chhagan Bhujbal

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chhagan Bhujbal महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासकीय निर्णय (जीआर) मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय न्यायालयाच्या निकालाविरोधात आहे आणि त्यामुळे ते या जीआरला न्यायालयात आव्हान देणार आहेत.Chhagan Bhujbal

त्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी मराठा समाजाची बाजू ऐकूण घ्यावी, यासाठी मराठा समाजाच्या वतीने आधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेटही दाखल करण्यात आली आहे.Chhagan Bhujbal



भुजबळ यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितले की, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल आहे. त्यामध्ये मराठा समाजाला वेगळे आरक्षण देणे संवैधानिक दृष्ट्या मान्य नाही, असे निकालात नमूद झाले आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने पुन्हा एकदा नवीन जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणे म्हणजे सरळसरळ न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे.

यापूर्वीही छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली नाराजी अनेक वेळा सार्वजनिकरीत्या व्यक्त केली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कायम ठेवत असताना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे हे इतर मागासवर्गीय समाजाच्या न्याय्य हक्कांवर गदा आणणारे ठरेल, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, परंतु दुसरीकडे ओबीसी समाजात असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत. छगन भुजबळ यांच्या या निर्णयामुळे आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हटले की अर्धा महाराष्ट्र पागल झाला – मनोज जरांगे

तुम्ही ठरवलेच आहे तर मनुष्यबळ द्या, तातडीने कामाला लावा आणि हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा मला मोठे पाऊल घ्यावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे आली नाही पाहिजे. मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हटले की अर्धा महाराष्ट्र पागल झाला. म्हणजे गरिबांच्या पोरांनी आणि मी आम्ही जीआर काढला तेव्हा काही अभ्यासक सुद्धा पागल झाले. आमचे विरोधक तर इतके पागल झाले आहेत की त्यांना झोपाच येत नाहीत. मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार.

Chhagan Bhujbal to Challenge Maratha Reservation in Court, Verification Underway

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात