विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातले विकास आघाडीचे सरकार पाडून केंद्रात येण्याची मला ऑफर होती. पण मी ती नाकारली. त्यांना सरकार पाडणे जमले नाही म्हणून केंद्रातले एक आणि दोन नंबरचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राजकीय सूड उगवत आहेत,असे विधान करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. Center offer to Pawar? When, who, what gave ?; Offer true? Or just a discussion ??
पण पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात वेगळ्याच विषयावर चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे पवारांना नेमकी ऑफर कोणी दिली? आणि कधी दिली? ती नेमकी कसली ऑफर होती? ऑफर नुसती महाविकास आघाडी सरकार पाडायची होती?, की केंद्रातले कोणते पद देण्याची होती?, याविषयी सोशल मीडियात जोरदार टीकाटिप्पणी सुरू आहे.
केंद्र सरकार मधले नंबर एक, नंबर दोनचे नेते शरद पवारांना राजकारणाच्या क्षेत्रात ज्युनियर आहेत. पण त्यांनी केंद्रात दोनदा पूर्ण बहुमताने सत्ता मिळविली आहे. त्यांनी शरद पवारांना कोणती ऑफर दिली? ती का दिली असेल? आपल्यापेक्षा ज्युनियर नेत्यांनी दिलेली ऑफर स्वीकारणे पवारांना रुचले नाही म्हणून पवारांनी ही ऑफर स्वीकारली नसेल का? या आणि अशा प्रश्नांवर सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू आहे.
केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना पवारांना या सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे प्रमुख केले होते. ही ऑफर पवारांनी स्वीकारली होती. मग आता केंद्रातल्या नेमक्या कोणत्या नेत्याने पवारांना कोणती ऑफर दिली असेल? ती ऑफर मोठ्या पदाची असेल की लहान पदाची असेल?, असे प्रश्न सोशल मीडियामध्ये विचारले जात आहेत…!!
किंबहुना ही ऑफर खरी असेल? की चर्चेची सोडलेली पुडी असेल? याची देखील चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.
आणखी एक चर्चा महाराष्ट्रात दबक्या आवाजात सुरू आहे… महाराष्ट्रातच काही “गडबड” असल्यामुळे पवारांनी केंद्रातल्या ऑफरची बातमी माध्यमांच्या चर्चेसाठी सोडून देऊन अन्य कोणाला तरी राजकीय इशारा दिला आहे…!!, याची देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App