इंगळे यांना सोमवारी (३ जानेवारी) एसटी महामंडळ कार्यालयाकडून बरखास्त का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.Buldana: ST employee dies of heart attack; Notice of Badar from ST Corporation
विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून संपावर आहेत.कर्मचारींनी रूजू होण्याचे सांगण्यात आले आहे.मात्र कर्मचारी संपावर ठाम असून कामावर रूजू होत नसलेल्या कर्मचारींवर कारवाई केली जात आहे.या कारवाईमुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
अशातच बुलडाणा आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.सिद्धार्थ इंगळे (वय ५४) असे निधन झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.इंगळे यांना सोमवारी (३ जानेवारी) एसटी महामंडळ कार्यालयाकडून बरखास्त का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
याच तणावात इंगळे यांचा मृत्यू झाल्याचे कर्मचारींचे म्हणने आहे. या घटनेने एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच कारवाईचा बडगा उपसले जात असल्याने बरेच कर्मचारी तणावात वावरत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App