स्व. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलाच्या जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.Brotherhood celebrated by the people for the soldiers is a precious moment in our lives – Chief of Fire Brigade Prashant Ranapise
विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘सर्वजण दिवाळीचा सण साजरा करीत असतात तेव्हा अग्निशमन दलाचे जवान मात्र ड्यूटीवर हजर असतात.दरम्यान या जवानांसाठी जनतेने साजरी केलेली भाऊबीज हा आमच्या जीवनातील अनमोल क्षण आहे,’ असे प्रतिपादन अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी केले.स्व. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलाच्या जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची भाऊबीज या उपक्रमाचे २६ वे वर्ष होते.
राज ठाकरे आजपासून शिवतीर्थवर राहणार; भाऊबीजेच्या मुहूर्तावर नवीन घरामध्ये प्रवेश
भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की अग्निशमन दलाच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी मुस्लिम औकाफ ट्रस्टच्या वतीने जवानांसाठी फराळासोबतच शिरखुर्मा बनवण्यात आला होता. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले. तर, डॉ. शंतनू जगदाळे यांनी आभार मानले.
या प्रसंगी लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, राज्य गुन्हे अन्वेषणचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे, राज्य मागासवर्गीय आयोगाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रकांत मेश्राम, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उद्योजक कृष्णकुमार गोयल, उल्हास पवार, अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री जयमाला इनामदार, विशेष पोलिस महानिरीक्षक निवृत्त विठ्ठल जाधव, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माजी आमदार मोहन जोशी, इक्बाल दरबार, मुश्ताक पटेल आदी या वेळी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App