यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग 7अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2) वरील डाऊनलाईन टनलचे ब्रेकथ्रू पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.Chief Minister Fadnavis
1 सप्टेंबर 2023 रोजी पहिले TBM (टनेल बोअरिंग मशिन) जमिनीपासून 30 मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आले. मेट्रो मार्ग 3 च्या वरुन सहार उन्नत रस्त्यांखालून, मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करुन TBM ने बोगद्याचे ब्रेकथ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण केले. TBM ब्रेकथ्रूचा हा संपूर्ण कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशन ते एअरपोर्ट कॉलनी स्टेशनदरम्यान हा 1.65 किलोमीटरचा बोगदा असणार आहे. ही मेट्रो जोडणी मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मेट्रो जाळ्यासाठी महत्त्वाचा टप्पा असणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा-भाईंदर व पुढे वसई-विरार हे भाग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मेट्रोने जोडले जातील. सद्यस्थितीत या मेट्रो मार्गाचे 59 टक्के काम पूर्ण झाले आहे.
या मेट्रो मार्गाची लांबी 3.4 किलोमीटर असून त्यापैकी उन्नत मार्ग 0.94 किलोमीटर आणि भूमिगत 2.50 किलोमीटर आहे. या मार्गावर 2 स्थानके असणार आहेत. उन्नत मार्गावर एअरपोर्ट कॉलनी हे पहिले स्थानक तर दुसरे भूमिगत स्थानक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असणार आहे. उन्नत मेट्रो मार्ग 0.57 किलोमीटर असेल तर दुहेरी बोगद्याची लांबी 2.035 किलोमीटर आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App