विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत बऱ्याच दिवसांनी रंगल्या भेटीगाठी, झाले नाश्तापाणी तसेच दिल्लीत झाली डिनर डिप्लोमसी!! आजचा 10 फेब्रुवारी 2025 चा दिवस असा संमिश्र राजकीय घडामोडींचा ठरला.Breakfast diplomacy in mumbai, dinner diplomacy in delhi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी नाश्ता पाणी करण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर पोहोचले. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेला उधाण आले. महापालिका निवडणुकांमध्ये भाजप + मनसे युती होणार, भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होणार वगैरे चर्चेला माध्यमांनी उकळी आणली. पण ती उकळी फडणवीसांनी खाली बसवली. राज ठाकरे यांच्याकडे फक्त नाश्तापाणी करायसाठी आलो होतो, असे सांगून फडणवीस यांनी विषय मिटवून टाकला, तरी देखील फडणवीस राज ठाकरे यांच्या बैठकीचा विषय माध्यमांना दिवसभर पुरला.
फडणवीस – राज ठाकरे भेटीची चर्चा हवेत असतानाच उद्धव ठाकरेंचे पीए आमदार मिलिंद नार्वेकर फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. त्यामुळे चर्चेला आणखी उकळी फुटली.
मुंबईत अशा भेटीगाठींचा सिलसिला रंगत असताना दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी रंगली. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरीही डिनर डिप्लोमसी झाली. संसदीय सचिवालयाने आयोजित केलेल्या फर्स्ट टाइम आमदारांच्या बैठकीला महाराष्ट्रातून 78 आमदार गेले. यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 आमदार होते. या सगळ्या 78 आमदारांना श्रीकांत शिंदे यांनी पंडित पंत मार्गावरच्या आपल्या सरकारी निवासस्थानी जेवायला बोलावले होते. ही डिनर डिप्लोमसी शरद पवारांच्या निवासस्थानी नेहमी व्हायची. ती श्रीकांत शिंदे यांनी फॉलो केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदार फुटीच्या ऑपरेशन टायगर चर्चेला उधाण आले.
त्याचवेळी शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे बडे नेते जमले होते. तिथे त्यांनी जेवण घेतले. या सगळ्या बैठकांमध्ये चर्चा राजकीयच झाल्या, पण त्या बाहेर मात्र कुणी सांगितल्या नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App