विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात भरीत पार्ट्यांना यंदा ब्रेक लागला आहे. कारण अतिवृष्टीने वांगी कोपली असल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे. Break parties in Jalgaon district this year; Eggplant cropped due to heavy rains; Hiramod of the eater
जळगाव हे चवदार वांग्यांसाठी आणि खास करून भारताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध आहे. थंडी आली म्हणजे जळगाव जिल्ह्यात भरीत पार्टी सुरू होते. यंदा मात्र खवय्यांचा भरीत वांग्याच्या वाढलेल्या भावामुळे हिरमोड झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात थंडीच्या दिवसात प्रामुख्याने डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये भरीत पार्टी जोरात सुरू असते. परंतु यावर्षी अतिवृष्टी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे भरताचे वांग्याचे उत्पन्नात घट आल्याने मार्केटमध्ये वांग्याची आवक कमी झाली.
भरताचे वांगेचे भाव७० ते ८० रुपये किलोनी विकली जात आहेत. त्यामुळे खवय्यांना खिशाला ताण बसत असल्याने भरीत पार्टी कुठेतरी कमी होताना दिसत आहे. परंतु एकीकडे भरताचे वांग्याला लिलावात भाव जरी असला तरी आवक कमी असल्याने भरीत वांगी उत्पादक शेतकरी हे उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात येत नसल्याने तेदेखील चिंतेत आहे.
Break parties in Jalgaon district this year; Eggplant cropped due to heavy rains; Hiramod of the eater
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App