पूजा खेडेकर यांच्या आईचा आणखी एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. घराबाहेर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडेकर कायमच वादात सापडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा गैरवापर करण्यापासून आयएएसची नोकरी मिळवून देण्यापर्यंत अनेक प्रकारचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. अशा परिस्थितीत आता पूजाच्या आईचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या काही लोकांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावताना दिसत आहेत. bouncer behind and threats to farmersVideo of IAS Pooja Khedekar mother goes viral
हा व्हिडिओ 2023 मधला आहे, ज्यामध्ये पूजा खेडेकरची आई मनोराम खेडेकर हातात बंदूक घेऊन काही लोकांना धमकावत आहे. वास्तविक हे प्रकरण शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. जमिनीचा ताबा देण्याबाबत त्या शेतकऱ्याला धमकावत असल्याचा आरोप आहे.
काय प्रकरण आहे?
पूजा खेडेकरचे वडील दिलीप खेडेकर यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांनी सरकारी नोकरीच्या काळात कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडेकर कुटुंबीयांनी 25 एकर जमीन खरेदी केल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी जवळच्या शेतकऱ्यांच्या जमिनीही बळकावण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे.
मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केल्याने खेडेकर यांच्या आई मनोरमा खेडेकर या बाऊन्सरसह घटनास्थळी पोहोचल्या आणि शेतकऱ्यांना धमकावले. यावेळी त्यांच्या हातात बंदूक होती, ज्याने त्या शेतकऱ्यांना धमकावत होत्या. तर, शेतकऱ्यांनी पुण्यातील पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, दबावामुळे त्यांची तक्रार दाखल होऊ शकली नसल्याचं सांगितलं गेलं आहे.
महाराष्ट्र केडर प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडेकर यांच्या आईचा आणखी एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. घराबाहेर उभे राहून व्हिडीओ बनवणाऱ्या मीडिया कर्मचाऱ्यांवर त्यांनी हल्ला केला. माझ्या मुलीने आत्महत्या केली तर तुम्हा सर्वांना आत घालेन, असे पूजा खेडेकरच्या आईने सांगितले होते. प्रसारमाध्यमांना धमकावून कॅमेरावरही मारला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App