विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाने विधिमंडळाच्या बाहेर आज दिवसभर दिशा सालियन + आदित्य ठाकरे प्रकरणावर राजकीय गदारोळ झाला. जुनेच आरोप – प्रत्यारोप पुन्हा उगळले गेले. नितेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्यात वाग्युद्ध रंगले. त्यामध्ये दोन्ही बाजूंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांचे वाभाडे काढून घेतले. पण या सगळ्या दोन मुलींच्या हत्या प्रकरणांच्या राजकीय चिंध्या झाल्या. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिशा सालियन Disha salian प्रकरण विधानसभेत काढल्याबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संजय राठोड – पूजा चव्हाण प्रकरण बाहेर काढले.
दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात नव्याने अर्ज सादर केल्याने त्या प्रकरणावरचा पडदा पुन्हा उघडला. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी झाली. उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण सध्याच्या सत्ताधार्यांवरच उलटेल, असा दावा केला.
आम्हाला जे काही सांगायचं ते आम्ही कोर्टात सांगू असे सांगून आदित्य ठाकरे यांनी हात झटकले. पण शंभूराज देसाई आणि नितेश राणे या दोन मंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर दिवसभर माध्यमांनी बातम्या चालवल्या.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना कॉर्नर केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संजय राठोड – पूजा चव्हाण प्रकरण बाहेर काढले. संजय राठोड देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कसे??, असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपस्थित केला. त्यावर संजय राठोड यांना उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना क्लीन चीट दिली म्हणून ते मंत्रिमंडळात आले असा संताप भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. पण ही दोन्ही प्रकरणे वारंवार समोर येऊन देखील नेमकेपणाने कुणालाही शिक्षा झाली नाही, त्याविषयी कुठल्याच पक्षाचा आमदार किंवा नेता बोलला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App