नाशिक : काका + पुतण्यांच्या पक्षांचे गुंडगिरीला सारखेच प्रोत्साहन; मारामाऱ्या करणाऱ्यांना दिले प्रमोशन!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडल्याचे समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचे प्रमोशन केले, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने लातूरमध्ये मारामारी करणाऱ्या सुरज चव्हाणचे प्रमोशन केले. सुरज चव्हाणच्या प्रमोशन वर रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून अजितदादांची प्रतिमा हानी करण्यासाठी हे प्रमोशन झाल्याची टीका केली, पण स्वतःच्या पक्षात नितीन देशमुख चे झालेले प्रमोशन मात्र दुर्लक्षित ठेवले. Nitin Deshmukh and Suraj Chavan
काका आणि पुतण्याच्या राष्ट्रवादींनी गुंडगिरी करणाऱ्यांचे सारखेच समर्थन केले. मारामारी करणाऱ्यांना प्रमोशन दिले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधिमंडळात मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखला प्रदेश पातळीवरचा प्रवक्ता नेमले. त्याचे नियुक्तीपत्र जितेंद्र आव्हाड या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या सहीने निर्गमित झाले. नितीन देशमुख हा जितेंद्र आव्हाड यांचाच समर्थक कार्यकर्ता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी 16 जणांची महाराष्ट्रातल्या प्रवक्ते पदी निवड केली. त्यात नितीन देशमुखचा आवर्जून समावेश केला. नितीन देशमुख याच्यावर विधिमंडळात मारामारी केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर त्याच्या चौकशी आणि तपासाची काम विधिमंडळाच्या शिस्तपालन समितीकडे आहे. चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यानंतर नितीन देशमुखला गंभीर शिक्षा होऊ शकते, पण तरी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नितीन देशमुखची निवड नियुक्ती प्रवक्ते पदी केली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरज चव्हाणची पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली. विधिमंडळात रमी खेळणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर याच सुरज चव्हाणने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना लातूरमध्ये मारहाण केली होती. हे प्रकरण राष्ट्रवादीच्या अंगलट आल्यानंतर अजित पवारांनी सुरज चव्हाणला पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यायला सांगितले होते. त्यानुसार त्याने राजीनामाही दिला होता, पण त्यानंतर महिनाभरातच राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली. सुरज चव्हाणच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. सुरज चव्हाण शच्या नियुक्तीवरून रोहित पवारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली. अजित पवारांची प्रतिमा हानी करण्यासाठी भाजप प्रेमी नेत्यांनी सुरत चव्हाण ची नियुक्ती केल्याचा दावा रोहित पवारांनी केला, पण स्वतःच्याच पक्षात पक्षाने विधिमंडळात मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचे प्रमोशन केल्याचे सत्य रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले नाही.
सुरज चव्हाणच्या नियुक्तीनंतर छावा संघटना पुन्हा प्रमुख झाली असून आता सुनील तटकरे यांना महाराष्ट्र कुठे फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा… pic.twitter.com/hC1ekCL28W — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 14, 2025
लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?
अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा… pic.twitter.com/hC1ekCL28W
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 14, 2025
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App