विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister : निवडणूक वर्षात गणेशोत्सवात जनता गणेश भक्तीत रंगून गेली असली, तरी नेत्यांनी मात्र गणेशोत्सवातले राजकारण सोडलेले नाही. गणपतीची प्रार्थना करताना देखील सगळ्या नेत्यांनी सत्तेचेच साकडे घातले. कुठलेच पक्ष आणि नेते त्याला अपवाद ठरले नाहीत. Both NCP wants chief ministership only without their own capacity
पण त्या पलीकडे जाऊन अनेक नेत्यांच्या समर्थकांनी गणपतीला जे साकडे घातले, त्यातून वर उल्लेख केल्याप्रमाणे राजकीय कर्तृत्वात कुंपणाच्या आतच उडी, पण राष्ट्रवादी प्रवृत्तीला मुख्यमंत्रीपदाची मोठी खुमखुमी!! हेच दिसून आले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी गणपतीला साकडे घालताना पुढच्या वर्षी अजितदादा मुख्यमंत्री म्हणून “वर्षा” बंगल्यावर गणेशाची स्थापना करतील असा आशावाद व्यक्त केला, तर राष्ट्रवादी मधूनच भाजपमध्ये गेलेल्या महिला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळावे, असे गणरायाला साकडे घातले.
देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आदी नेत्यांनी महायुतीतल्या नेत्यांना आणि विरोधकांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी, असे साकडे घातले. राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या नेत्यांना मात्र मुख्यमंत्रीपदा शिवाय दुसरे काही दिसत नाही, हे त्यांनी गणेशोत्सवातही सिद्ध केले.
Vinesh Phogat-Bajrang Punia : विनेश फोगाट-बजरंग पुनियाचा आज काँग्रेस प्रवेश; जुलानामधून विनेशचे तिकीट निश्चित; बजरंगला प्रचाराची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती, तेव्हा देखील राजकीय कर्तृत्वाच्या दृष्टीने 60 – 70 आमदार या पलीकडे कधी गेली नाही. आता तर अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या फक्त 60 जागा लढवण्याची शक्यता आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील 70 80 जागांपेक्षा जास्त जागा लढवायला मिळण्याची महाविकास आघाडीत शक्यता नाही. पण पवारांच्या राष्ट्रवादीतले महत्त्वाकांक्षी नेते नियमित अंतराने “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टरवर चढवले जातात. त्यांचे समर्थक त्या पोस्टर भोवती जोरदार नाचकाम करतात. नंतर ती पोस्टर्स फाटतात किंवा उतरवली जातात. त्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षा पुढे गेलेल्या दिसल्या नाहीत.Chief Minister
त्या तुलनेत भाजप, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे नेते आपापल्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या मर्यादा ओळखून वागतात. या पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असलेले डझनवरी नेते आहेत, पण प्रत्येक जण राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या तुलनेत “सांभाळून” राहतो. पोस्टरवर नाव लावून मुख्यमंत्री होता येत नाही, याची जाणीव या तिन्ही पक्षातल्या नेत्यांना निश्चित असल्याने ते आपल्या महत्वाकांक्षा पोस्टरवर फारशा जाहीर करताना दिसत नाहीत, दिसले तरी त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही. Chief Minister
कारण मुख्यमंत्री पदाचा कुठलाही निर्णय भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांचे श्रेष्ठ दिल्लीतच घेतात. त्यातही शिवसेना अखंड होती तेव्हा बाळासाहेब म्हणतील ती “पूर्व” आणि फुटल्यावर उद्धव ठाकरे म्हणतील ती “पूर्व” अशा स्थितीत आहे त्यामुळे शिवसेनेतल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षा फारशा पोस्टरवर उतरतच नाहीत.
त्या तुलनेत राष्ट्रवादी प्रवृत्तीचे नेते मात्र मुख्यमंत्रीपदावर सातत्याने बोलत राहतात, पण त्यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या उड्या मात्र कुंपणाच्या आतच पडतात, हा इतिहास वर्तमान तर आहेच, पण भविष्यातही फार वेगळी घडण्याची शक्यता नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more