विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगलीत डॉक्टरने कुत्र्यावर अघोरी उपचार केले आहेत. तीन महिन्यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळातूनचं कापले. या प्रकरणी डॉ.सुनील कोल्हे यांच्या विरोधात संजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.Both ears of Doberman dog has cut off; Crime filed against Sangli doctor
मुळात डॉ.सुनील कोल्हे हे मानवाचे डॉकटर आहेत. ते जनावरांचे डॉक्टर नाहीत. परंतु, डॉ.सुनील कोल्हे यांनी हा अघोरी प्रकार केल्याने त्यांच्या विरोधात संजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉबरमॅन तसेच इतर जातीच्या श्वानामध्ये हा अघोरी प्रकार सर्वत्र केला जात आहे.
श्वान सुंदर दिसण्यासाठी आणि स्पर्धेत नंबर मिळण्याच्या हेतूने श्वानाना त्यांचे नैसर्गिक अवयव गमवावे लागत आहेत. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. ओंकार सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. सदरचा गुन्हा नोंद करण्यासाठी प्राणी मित्र सुनील हवालदार,कौस्तुभ पोळ यांनी सहकार्य केले.
डॉक्टरवर पुढील गुन्हे दाखल :-
१).प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०- कलम ११,३८. २)महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१- कलम ११९. ३)श्वान प्रजनन आणि विपणन नियम,२०१७ अंतर्गत कान कापणी आणि शेपटी डॉकिंग स्पष्टपणे प्रतिबंधित आहे. ४)भारतीय दंड संहिता १८६०- कलम ४२९.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App