मुंबई हायकोर्टाचा ऋतुजा लटकेंना दिलासा; राजीनामा स्वीकाण्याचे महापालिकेला आदेश

प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी 11.00 वाजेपर्यंत स्वीकारण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला उद्या ( शुक्रवारी) 11 वाजेपर्यंत राजीनामा घेण्याचे आदेश दिले आहेत. Bombay High Court’s relief to Rituja Latke

उद्धव ठाकरे गटाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकरला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला होता.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण देताना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 30 दिवसांत हा राजीनामा स्वीकारला जाईल, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यावर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल देताना, त्यांचा राजीनामा उद्या ( शुक्रवारी) सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा, असे निर्देश दिले आहेत.

मुंबई महापालिका आयुक्तांचा महत्त्वाचा खुलासा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामाच्या प्रश्नावर शिवसेना पक्ष आक्रमक झाला होता. परंतु, मूळात ऋतुजा लटके यांनी महापालिका सेवेचा राजीनामा दिला केव्हा??, याबद्दल महत्त्वाचा खुलासा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला. ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी राजीनामा सादर केला. कायदा आणि नियम त्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देतात. त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. या मुद्द्यावर राज्य सरकारकडून कोणत्या दबावाचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा इक्बाल सिंह चहल यांनी केला होता.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा शिंदे – फडणवीस सरकारने मुद्दामून अडवून ठेवला. कारण अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळू न देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे, असा आरोप पक्षाचे नेते अनिल परब यांनी करून हायकोर्टात गेले होते. त्याच वेळी ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचीच उमेदवारी देण्याचा घाट घातला असल्याची बातमी देखील आली होती.

परंतु या संदर्भातील कायदेशीर मुद्दा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केला होता. ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी राजीनामा दिला. कायदा आणि नियमानुसार या संदर्भात निर्णय घेण्याची मुभा 30 दिवसांची आहे. अशा स्थितीत राज्य सरकारचा त्यासंदर्भात कोणताही दबाव असण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

मात्र, हायकोर्टाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी 11.00 वाजेपर्यंत स्वीकारा असे आदेश महापालिकेला दिले आहेत.

Bombay High Court’s relief to Rituja Latke

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात