विशेष प्रतिनिधी
पुणे :बॉलीवूडची धाकड गर्ल, गोल्डन बीडदास अभिनेत्री कंगना राणावत कायमच आपल्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते . कंगना कायमचं आपल्या परखड विधानाने चर्चेत असते.ती धार्मिक असल्याचंही सर्वांनाच माहित आहे. ती वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देत असते.केदारनाथ मंदिरात जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेतले. आता पुन्हा तिने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थानाला भेट दिली. Bollywood actress Kangana.
View this post on Instagram A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)
यावेळी ती महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर कंगनाने गुरुवारी संध्याकाळी त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत तिचे कुटुंबही होते. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टकडून कंगनाचा सत्कार देखील करण्यात आला आहे.कंगनाने त्र्यंबकेश्वर येथील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कंगना यावेळी सलवार सूटमध्ये दिसत आहे. तसेच तिचे कुटुंबीय देशील या फोटोंमध्ये दिसत आहेत.
कंगनाने आपल्या समाज माध्यमातून दर्शनाचे काही फोटो शेअर केले आहेत. आज त्रिंबकेश्वरांचे दर्शन घेतलं असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे .या फोटोत कंगना मंदिरात, नंतर कर्मचाऱ्यांसोबत मंदिराबाहेर आणि पुजाऱ्यांसोबत दिसत आहे. यावेळी कंगना पांरपारिक वेषात दिसली. तिने सलवार सूट परिधान केला होता आणि लोकांना तिचा लूक खूप आवडला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more