प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेतील विविध घोटाळ्यांसंदर्भात ऑडिटर अँड कंट्रोलर जनरल अर्थात कॅगने मारलेल्या ताशेऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व घोटाळ्यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. कोरोना काळात झालेले 12000 कोटींचे घोटाळे त्यामुळे स्कॅनर खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाग आली असून त्यांनी मुंबई महापालिकेतील ठेवींसंदर्भात शिंदे – फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै रोजी शिवसेनेच्या मोर्चाची घोषणा केली आहे.BMC frauds inquiry : uddhav thackeray announced 1 July morcha of shivsena
उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या मोर्चाची घोषणा केली. मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांसंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार आशिष शेलार यांच्यासह बाकीच्या भाजप नेत्यांनी गेल्या दोन – अडीच वर्षांमध्ये वारंवार पत्रकार परिषदा घेऊन आरोप केले. त्या काळात कोरोना काळात मुंबईमध्ये किशोरी पेडणेकर यांच्या रूपाने शिवसेनेच्या महापौर होत्या, तर यशवंत जाधव शिवसेनेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्या काळात कोविड हॉस्पिटल उभारण्यापासून हॉस्पिटल साहित्य खरेदी तसेच वेगवेगळ्या रस्त्यांच्या दुरुस्त्या खड्डे भरणे यामध्ये अनियमितता झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले. मुंबईच्या रस्त्यावरचे नुसते खड्डे भरण्यासाठी 650 कोटी रुपयांची निविदा काढल्याची बाब समोर आली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी आणि तपास समिती नेमली आहे. ही तपास समिती नेमताच उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या जाग आली आणि त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. मुंबई महापालिकेच्या ठेवी आणि त्यांचा वापर यासंदर्भात तसेच ठाकरे पवार सरकारच्या काळात मुंबईतले अनेक प्रकल्प रखडवले म्हणून शिंदे – फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी 1 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली. या मोर्चाचे नेतृत्व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करतील आणि त्यांच्याबरोबर बाकीचे शिवसेना नेते असतील, असे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांचे समर्थन
याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचे समर्थन करताना आडवाणी जीनाच्या कबरीवर माथा टेकायला का गेले होते?, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाशरीफ यांचा वाढदिवसाचा केक खायला का गेले होते?, असे सवाल केले. औरंगजेबाचे नाव वापरून भाजपला दंगली घडवायच्या आहेत, आरोप त्यांनी केला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीची आवडाबाई म्हणून घेतले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App