विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महानगरपालिकेद्वारे नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत कायदे आणि नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आता आदेश दिले आहेत की 31 डिसेंबरला मुंबईतील बंदिस्त किंवा मोकळ्या जागेवर नव्या वर्षाशी संबंधित कोणत्याही पार्टी किंवा उत्सवाला संमती दिली जाणार नाही.
राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी असणार आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नवा आदेश दिला आहे. मुंबईत थर्टी फर्स्टची पार्टी बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत कऱण्यासाठी संमती दिली जाणार नाही असं या आदेशात म्हटलंय.
काय म्हटलं आहे आदेशात?
बृहन्मुंबईच्या महानगरपालिका हद्दीत नवीन वर्षाचा कोणताही कार्यक्रम/कार्यक्रम/मेळावा/पार्टी/कार्यक्रम किंवा कोणत्याही बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत होण्यास परवानगी दिली जाणार नाही.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय अंमलात असेल. हा आदेश न पाळल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार शिक्षा देण्यात येईल.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय या अनुषंगाने आम्ही हा आदेश काढला आहे असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. या आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्ण संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. कोव्हिड प्रकरणांमध्ये वाढ होऊ नये आणि लोकांना त्याचा पुढे त्रास होऊ नये हे जास्त महत्त्वाचे आहे.
नवे वर्ष उत्साहात साजरे करण्यासाठी गर्दी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणं आवश्यक आहे असंही महापालिकेने म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App