‘’आम्हाला प्रश्न विचारण्याआधी सभेला येण्यापूर्वी थोडा आरश्यात तोंड बघायला हवं होतं’’; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

‘’तरीही प्रश्न आम्हाला विचारता? माणसाने किती कोडग व्हावं उद्धवराव?’’ असंही भाजपाने ट्वीट केलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये काल महाविकास आघआडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाषणातून शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपवर तोंडसुख घेतले. विशेषकरून उद्धव ठाकरे यांनी होमग्राउंडवर जोरदार भाषण करत, शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ज्यास भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. BJPs response to Uddhav Thackerays criticism of Shinde Fadnavis government in Mahavikas Aghadis Vajramooth meeting

”उद्धव ठाकरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा अडीच वर्षांत तुम्ही काय दिवे लावले ते बघा. १०० कोटींची वसुली प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख तुरूंगात गेले, दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक आजही तुरूंगात आहेत. वसुलीसाठी सचिन वाझे सारख्या गुन्हेगार पोलिसाला सेवेत घेऊन उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवली. स्फोटके ठेवणाऱ्यांना पाठीशी घालत तो काय लादेन आहे का? असा प्रश्न करत वाझेला पाठीशी घातलं. आम्हाला प्रश्न विचारण्याआधी सभेला येण्यापूर्वी थोडा आरश्यात तोंड बघायला हवं होतं.” असं भाजपाने ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

याशिवाय ”तुमच्या अहकारांमुळे मुंबई मेट्रो प्रकल्प रखडून गेला. अहंकार तुमचा किंमत मात्र मुंबईकरांना मोजावी लागत आहे. आकासापोटी संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरलं तुम्ही, अडीच वर्षात फुटकी कवडी तुम्ही शेतकऱ्यांना दिली नाही, तरीही प्रश्न आम्हाला विचारता? माणसाने किती कोडग व्हावं उद्धवराव?” अशा शब्दांमध्ये भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

BJPs response to Uddhav Thackerays criticism of Shinde Fadnavis government in Mahavikas Aghadis Vajramooth meeting

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात