‘’ठरवून फक्त कवितेच्या ओळी गाळता येतात उद्धव ठाकरे, जनतेला विश्वासात घेण्यासाठी नियत साफ लागते.’’ असा टोलाही भाजपाने लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जळगावमधील पाचोरा येथे काल उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान मोदी, भाजपा, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी भाषणा दरम्यान टीका करताना बहिणाबाईंच्या कवितेमधील ओळ ऐकत, निशाणा साधला. ज्यावर आता भाजपाकडूनही त्यांना जशासतसे प्रत्युत्तर दिले गेले आहे. BJPs response to Uddhav Thackerays criticism
‘’उद्धव ठाकरे, तुम्ही पाचोऱ्यात आले. महाकवयित्री बहिणाबाई यांची कविता ऐकवली. पण तुमचं सगळंच सोयीस्कर आहे. ही कविताही तुम्ही तुमच्या प्रमाणे ऐकवली, अगदी सोयीस्कर! “जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही..” इतकीच एक ओळ तुम्ही जनतेला ऐकवली पण तुम्ही सोयीस्कर गाळलेली पुढची ओळ अशी आहे – ‘’इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही’ ‘ज्याच्यामधी नाही भाव त्याले भक्ती म्हनु नही ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नही’’ ठरवून फक्त कवितेच्या ओळी गाळता येतात उद्धव ठाकरे, जनतेला विश्वासात घेण्यासाठी नियत साफ लागते!’’ असं भाजपाने ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
उद्धवजी, तुम्ही पाचोऱ्यात आले.महाकवयित्री बहिणाबाई यांची कविता ऐकवली.पण तुमचं सगळंच सोयीस्कर आहे.ही कविताही तुम्ही तुमच्या प्रमाणे ऐकवली, अगदी सोयीस्कर! "जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही.." (1/3) — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 23, 2023
उद्धवजी, तुम्ही पाचोऱ्यात आले.महाकवयित्री बहिणाबाई यांची कविता ऐकवली.पण तुमचं सगळंच सोयीस्कर आहे.ही कविताही तुम्ही तुमच्या प्रमाणे ऐकवली, अगदी सोयीस्कर!
"जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही.."
(1/3)
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 23, 2023
याशिवाय “उद्धव ठाकरे, भाजपा आणि शिवसेना युतीमध्येच लढणार आहे. आधी तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीचं कडबोळं सांभाळा. तुमच्या तिघांचे तीन दिशांना तोंड आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? मोदींचं नेतृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं.” असा पलटवारही भाजपाने केला आहे.
उद्धवजी, भाजप आणि शिवसेना युतीमध्येच लढणार आहे. आधी तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीचं कडबोळं सांभाळा. तुमच्या तिघांचे तीन दिशांना तोंड आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? मोदींचं नेतृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं. — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 23, 2023
उद्धवजी, भाजप आणि शिवसेना युतीमध्येच लढणार आहे. आधी तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीचं कडबोळं सांभाळा. तुमच्या तिघांचे तीन दिशांना तोंड आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? मोदींचं नेतृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं.
याचबरोबर पंतप्रधान मोदींवरी टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपाने “उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींवर टीका करण्यापूर्वी तुम्हाला २०१९साली तुमच्या दारातील कलानगरमध्येही आमदार निवडून आणता आला नाही हे विसरु नका. घरात बसून तुम्ही अडीच वर्षांत जनतेचे हाल केले. आता तुमचे बेहाल होत आहेत म्हणून तुम्हाला लोकांची आठवण झाली. तुमच्या या बेगडी प्रेमाला यंदा जनता भीक घालणार नाही.’’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App