काँग्रेस – राष्ट्रवादीच्या अजून “निवडक” आढावा बैठका; पण 48 लोकसभा, 288 विधानसभा प्रमुख नेमून भाजपचा कामावर जोर!!

प्रतिनिधी

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींना अनुक्रमे एक ते दीड वर्ष अवधी असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी “निवडक” आढावा बैठकांमध्ये मग्न आहे. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते प्रत्येक मतदारसंघांचा अजून आढावा घेत आहेत. पण दरम्यानच्या काळात भाजपने मात्र महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रमुख नेमून कामावर जोर देखील दिला आहे. BJP’s emphasis on work by appointing 48 Lok Sabha, 288 Assembly chiefs

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या मतदार संघाच्या आढावा बैठका सध्या सुरू आहेत. त्यामध्ये नेमके उमेदवार कोण?, यावर चर्चा सुरू आहे. पण मूळातच त्यांच्याकडे ऑप्शन्स मर्यादित आहेत. त्यामुळे त्याच त्याच उमेदवारांच्या नावांभोवती मराठी माध्यमे चर्चा घडवत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे निवडणूक प्रमुख नेमून त्यांच्याकडे प्रत्येक मतदारसंघांची विशिष्ट जबाबदारी देखील सोपवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख नेमले आहेत. त्या पाठोपाठ महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमध्ये देखील भाजपचे निवडणूक प्रमुख नेमले आहेत. या निवडणूक प्रमुखांवर प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत भाजपची संघटनात्मक पातळीवरची जबाबदारी असणार आहे.

वास्तविक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप युती एकत्रित सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभेच्या 48 जागा भाजप लढवणार नाही, तर काही जागा शिवसेनेसाठी सोडेल. तसेच 288 पैकी काही जागा शिवसेनेला सोडाव्या लागतील. तरीदेखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये भाजपचा एक नेता प्रमुख नेमून त्याच्याकडे संघटनेपासून निवडणुकीपर्यंतची जबाबदारी निश्चितपणे सोपविली आहे. यामध्ये भाजप संघटनेतले प्रमुख पदाधिकारी तसेच विद्यमान आमदार आणि खासदार यांचा देखील समावेश आहे.

विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली असून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे परळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे, तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवली असून वडगाव शेरी मतदारसंघाची जबाबदारी जगदीश मुळीक यांच्याकडे सोपवली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्याकडे सोपवली असून बारामती मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे सोपवली आहे.

कोल्हापूरमध्ये राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, तर ठाण्यात विनय सहस्रबुद्धे जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच दिंडोरी मतदार संघाची जबाबदारी बाळासाहेब सानप, तर नाशिक मतदार संघाची जबाबदारी केदा नानाजी आहेर यांच्याकडे सोपवली आहे.

विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील भाजपने उभरत्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे. यामध्ये पुण्याच्या शिवाजीनगरची जबाबदारी दत्ताभाऊ खाडे, वडगाव शेरीची जगदीश मुळीक, कोथरूडची जबाबदारी पुनीत जोशी, कर्जत जामखेड जबाबदारी राम शिंदे, परळीची जबाबदारी प्रीतम मुंडे, माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रणजीत सिंह मोहिते पाटील, कुडाळ मतदारसंघाची जबाबदारी निलेश राणे, कागल विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी समरजीत सिंह घाटगे आदी नेत्यांकडे सोपविली आहे.

राष्ट्रवादीत नेहमी भाकऱ्या फिरवण्याची भाषा केली जाते. पण तिथे मुळातच भाकऱ्याच मर्यादित असल्याने त्या फिरवण्याची वेळही फार क्वचित येते. पण भाजपने मात्र भाकऱ्या फिरवण्याची भाषा न करता प्रत्यक्षात बऱ्याच भाकऱ्या फिरवल्याचे या यादीतून दिसत आहे.

BJP’s emphasis on work by appointing 48 Lok Sabha, 288 Assembly chiefs

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात