विशेष प्रतिनिधी
भिवंडी : भिवंडीमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह त्याच्या एका सहकार्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या तरुणांची नावं आहेत. प्रफुल्ल तांगडी हा भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होता. Prafull Tangadi
सोमवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे ही घटना घडली. घटनेनंतर लगेचच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वातावरण आणखी तणावपूर्ण होऊ नये, यासाठी लगेचच तिथे पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला.
नक्की घडलं काय?
रात्री सुमारे ११ वाजता प्रफुल्ल तांगडी हे आपल्या सहकार्यासोबत जेडीटी या आपल्या कार्यालयात बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी हे दोघेही रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात चार ते पाच हल्लेखोरांनी एकत्रितपणे हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र व्यावसायिक कारणावरून हत्त्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावला जात आहे. Prafull Tangadi
याआधीही झाला होता हल्ला
प्रफुल्ल तांगडी यांच्यावर याआधीही तीन वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र तेव्हा पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याचा गंभीर आरोप तांगडी यांच्या घरच्यांनी केला आहे. हत्या झाल्यानंतर तांगडी कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला आहे. ‘जोपर्यंत सर्व आरोपी अटकेत घेतले जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
बाळ्या मामा यांच्यावरही आरोप
याप्रकरणी तांगडी कुटुंबीयांनी ११ जणांवर संशय व्यक्त केला असून, भिवंडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला गेला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आरोपींना सोडवण्यासाठी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप प्रफुल्ल तांगडे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात बराच गोंधळ उडाला आहे. Prafull Tangadi
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App