…भाजपने बक्कळ पैसा कमावला असता; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

प्रतिनिधी

मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता आणि एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन सरकारमधील नेते विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरुनच थेट ट्विटरचा मालक एलॉन मस्कच्या ट्विटला रिट्विट करत विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधक महाराष्ट्रात भाजपविरोधात फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. जर या प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी पैसा मोजला असता तर भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. BJP would have made a lot of money; Devendra Fadnavis taunts opponents

फडणवीस यांनी काही पत्रकारांवर टीका करताना त्यांना HMV असे म्हटले होते. त्यानंतर आता एलॉन मस्कच्या ट्वीटला रिट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर मिश्कील टीका केली असती

एलॉन मस्कचे ट्विट

उद्योगपती एलॉन मस्कने ट्विटरचे मालकत्व स्विकारल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू होणार का?, असा प्रश्न विचारण्यात येत होता. याबाबत एलॉन मस्कने ट्विट केले होते. ट्रम्प ट्विटरवर परत येणार का, असा प्रश्न जेव्हा जेव्हा मला कोणी विचारला असेल आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या मागे मला डॉलर मिळाला असता तर आज ट्विटरकडे भरपूर पैसा असता, असे ट्विट एलॉन मस्क यांनी केले आहे. त्याच्या याच ट्विटला देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विट केले आहे.

फडणवीसांचे रिट्वीट

मी आणि माझ्या पक्षाबाबत विरोधक आणि HMV कडून पसरवण्यात येणा-या प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी जर मला एक रुपया मिळाला असता, तर आज भाजपने बक्कळ पैसा कमावला असता, असं फडणवीस यांनी मस्कच्या ट्वीटला रिट्वीट करत म्हटले आहे.

BJP would have made a lot of money; Devendra Fadnavis taunts opponents

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात