हुकुमशाहीबद्दल बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आहे का? असा सवालही केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. विशेषकरून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान पवारांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना, उद्धव ठाकरे यांचीही एक प्रतिक्रिया समोर आली. “मी त्यांना सल्ला कसा काय देणार, मी दिलेला सल्ला जर पचनी नाही पडला तर काय करू?”, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray
चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ’’उद्धव ठाकरेच कुणाला पचनी पडले नाहीत. उद्धव ठाकरे असे नेते आहेत, ज्यांचे ४०-५० आमदार निघून गेले. खासदार निघून गेले आहेत. आता रोज लोक निघून जात आहे आणि अशा व्यक्तीकडे महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे. ज्यांना आपलाच पक्ष सांभाळता येत नाही, ते दुसऱ्याचं काय नेतृत्व करणार आहेत.’’
याचबरोबर ‘’जेव्हा तुम्ही(उद्धव ठाकरे) आमच्याबरोबर होता, तेव्हा मोदींबद्दल स्तुतीसुमनं किती उधळली आहेत, किती गुलाल तुम्ही उधळला आहे. त्याची आमच्याजवळ भाषणं आहेत आणि आता तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदावरून गेलात, तेव्हा तुम्हाला आता मोदींचा विरोध करणे भाग आहे. कारण, तुम्ही बेईमानीने मुख्यमंत्री झाला होता. आता लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस आले आहेत आणि आमची नैसर्गिक युती आहे.’’ असंही बावनकुळेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरे कुणालाही पचनी पडले नाहीत – प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी pic.twitter.com/9K2NfsYuR4 — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 4, 2023
उद्धव ठाकरे कुणालाही पचनी पडले नाहीत – प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी pic.twitter.com/9K2NfsYuR4
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 4, 2023
याशिवाय ‘’हुकुमशाहीबद्दल बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आहे का? जेव्हा ते मुख्यमंत्री होते. मी ट्वीट केलं आहे, त्यामध्ये म्हटलय मी, की नारायण राणेंना कशाप्रकारे तुरुंगात टाकलं, कंगणा रणावतचं घरं कशाप्रकारे पाडलं, एक छोट्या अधिकाऱ्याने एक कार्टून टाकलं त्याला कसं फरपटत नेलं, महाविकास आघाडीच्या मंत्र्याने लोकांना कशाप्रकारे बेदममारहाण केली. त्यामुळे हुकूमशाही उद्धव ठाकरेंची वागणूक आहे आणि त्यामुळेच ५० आमदार, १२ खासदार निघून गेले. तरी हुकूमशाही संपत नाही, त्यांना दुसऱ्यांना हुकूमशाही म्हणण्याचा अधिकार नाही.’’ असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App