उद्धव ठाकरेंकडे राहिलेले काहीजण लवकरच एकनाथ शिंदेंकडे आणि काही आमच्याकडे येतील – चंद्रशेखर बावनकुळे

BJP Leader ChandraShekhar Bawankule Criticizes Shiv Sena In Amrawati District

‘’कसबा निवडणुकीचा विजय महाविकासआघाडीचा नाही, शरद पवारांनी पुन्हा एकदा विश्लेषण करावं. ’’, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

प्रतिनिधी

उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीमधील खेडे येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली. याशिवाय आता राज्यभरात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सभा घेणे सुरू केल्याचे दिसत आहे. इतके दिवस मातोश्रीबाहेर न पडणार उद्धव ठाकरे आता राज्यभर दौरे करायल लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray


‘’आता महाराष्ट्रात ‘असरानी’ जिथेजिथे फिरतील तिथे…’’ – आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!


नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘’उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठं करण्यासाठी किती पैशांचा गैरवापर होतो. तिन्ही पक्ष किती कार्यकर्ते त्यांच्या सभेला पाठवतात. म्हणजे त्यांच्यामागे किती सहानुभूती येईल. उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे आपलंही जमून जाईल, असं काँग्रेस, राष्ट्रवादीला वाटतं. परंतु सहानुभूतीही नाही आणि त्यांना काही मिळणारही नाही.’’

याशिवाय ‘’उद्धव ठाकरे हे एकाच कारणासाठी दौरे करत आहेत. ते म्हणजे त्यांच्याकडे जे उरलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ नयेत. त्यामुळे ते पक्ष वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. परंतु ज्या पद्धतीने आता जनतेने आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाहीलं आहे, हिंदुत्ववादी विचारांशी तडजोड उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत राहायला तयार नाही. म्हणून ते पक्ष वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. लवकरच दिसेल की त्यांच्याकडे राहिलेले काही एकनाथ शिंदेंकडे जातील काही आमच्याकडे येतील.’’ असं विधानही बावनकुळेंनी केलं.

याचबरोबर ‘’त्यांनी तिघांनी एकत्र यावं आम्हीही ५१ टक्क्यांची तयारी केली आहे आणि पुढेही आम्ही जिंकू. मी वारंवार सांगितलं आहे, शरद पवारांनी कसबा निवडणुकीचं पुन्हा एकदा विश्लेषण करावं. कसबा निवडणुकीत धंगेकरांचा विजय आहे, महाविकास आघाडीचा विजय नाही. सुप्त एक सहानुभूती धंगेकरांच्या बाजूने होती. आम्हाला अपेक्षित मतदान मिळालं आहे. जे मुक्ता टिळक, गिरीश बापट यांना मिळालं होतं, तेवढंच रासने यांना मिळालं आहे. आता थोडी मतांची जी त्यांच्याकडे वाढ झाली ती केवळ उमेदवारामुळे झाली आहे. त्यामुळे त्यांना कसब्याचा प्रयोग जर महाराष्ट्रात करायचा असेल तर थांबवलं कोणी? शेवटी जनमताचा कौल आहे, जनमत जिकडे आहे तिकडे लोक कौल देतील.’’ असंही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात