‘’हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत” आहात, तर आता सांगाच…’’ बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान!

BAWANKULE AND THAKREY

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंनी लक्ष्य केले आहे.

विशेष प्रतिनिधी

नागपूर : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून  दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडल्यानंतर प्रथमच  उद्धव ठाकरे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिमला भेट देणार आहेत.  दरम्यान, काल यवतमाळमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. त्या टीकेला भाजपाकडूनही प्रत्त्युत्तर दिले गेले आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule challenges Uddhav Thackeray

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे की, ‘’उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीचे पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे.’’

याशिवाय ‘’उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा!! पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या “शपथा” का घेताहात?’’ असा टोलाही लगावला आहे.

याचबरोबर, ‘’मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत?  घ्या, जगदंबेची शपथ !! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत ” आहात,  तर आता सांगाच तुमचे “सुत” कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता.!! उद्धव ठाकरे, चर्चा तर होणारच!’’ असं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

BJP state president Chandrashekhar Bawankule challenges Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात