‘’संजय राऊतांना काही कामधंदे नाहीत, त्यांचा पक्ष…’’; चंद्रशेखर बावनकुळेंकडून टीकेवर प्रत्युत्तर!

कशासाठी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण खराब करायचं? असा प्रश्नही विचारला आहे.

विशेष प्रतिनिधी

नागपूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपा, पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रया दिली आहे. याचबरोबर यापुढे जर भाजपा नेत्यांवर व्यक्तिगत स्वरुपाची टीका केली तर भाजपा काय करेल हे तुम्हाला दिसेल असा इशाराही दिला. BJP State President Chandrasekhar Bawankule responded to Sanjay Raut’s criticism

नागपूरात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘’संजय राऊतांना काही कामधंदे नाहीत. त्यांचा पक्ष रोज कमी होतोय, तो किंचत, किंचत होत चालला आहे आणि त्यांना पक्ष वाढवण्यासाठी कुठं फिरावं लागत नाही. आम्हाला पक्ष वाढीसाठी रोज फिरावं लागतं. त्यामुळे संजय राऊतांवर बोलण्यासाठी आमच्याकडे वेळही नाही. एकतर त्यांची संघटनाही कमी होत चालली आहे, त्यामुळे ते नैराश्यात आहेत आणि दुसरीकडे सरकार गेल्यामुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वेळचवेळ आहे, दिवसभर लिहीत राहतात, बोलत राहतात. आम्हाला वेळ नसल्याने आम्ही त्यांची किती उत्तरं द्यावी आणि कशासाठी द्यावीत? कशासाठी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण खराब करायचं? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे संजय राऊतवर काही बोलणं योग्य नाही.’’

याचबरोबर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळेंनी म्हटलं की, ‘’आमच्या नेत्यांवर जर तुम्ही टीका, टिप्पणी कराल. देवेंद्र फडणवीसांवर जर तुम्ही टीका टिप्पणी कराल. ज्या देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला २०१४ ते २०१९ कालावधीत भावासारखं प्रेम केलं. प्रत्येक विषयाची चर्चा करून महाराष्ट्रात निर्णय घेतले आणि आज तुम्ही सत्ता गेल्यानंतर, तुमची खुर्ची गेल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही नैराश्यात देवेंद्र फडणवीसांवर बोलत आहात, पहिल्यांदा तुमची चूक आम्ही सोडून देतोय, पण यानंतर जर पुन्हा देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदींवर, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अशाप्रकारे व्यक्तिगत स्वरुपाची टीका केली, त्यांच्या जीवनावर जर तुम्ही बोलले तर भाजपा काय करेल हे तुम्हाला पुढे दिसेल.’’

BJP State President Chandrasekhar Bawankule responded to Sanjay Raut’s criticism

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात