‘’त्यावेळी राज्यात सारं काही अलबेल आहे याच अविर्भावात तुम्ही वावरत होतात.’’ असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनमा द्यावा, असं विधान केलं. यावर भाजपाने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. BJP Spokesperson Keshav Upadhye Criticizes Supriya Sule For Demanding Devendra Fadnavis To Resign As Home Minister
‘’सुप्रिया सुळेताई, ज्या अधिकाराने तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागताय त्याच अधिकाराने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला असता तर बरं झालं असतं. मागच्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था त्रेधातिरपीट उडाली होती, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना खुद्द गृहमंत्र्यांकडून १०० कोटींचे टार्गेट दिले जात होते, पालघरमध्ये साधूसंतांना मारहाण करून जीव घेतला गेला. त्यावेळी राज्यात सारं काही अलबेल आहे याच अविर्भावात तुम्ही वावरत होतात, त्यावेळी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही?’’ असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण, पण बेकायदा वागणाऱ्याला सोडणार नाही; फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना प्रतिटोला
याशिवाय सुप्रिया सुळेंच्या या विधानावर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांना मनातून असे वाटतेय की, मी गृहमंत्री राहिलो नाहीतर बरं होईल. पण मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा पदभार दिलाय. जे चुकीचे आणि बेकायदा काम करतील त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी मी 5 वर्षे पद सांभाळले आहे. आता जे लोके बेकायदेशीर काम करतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबतही नाही, जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो. कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल.’
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
‘महाराष्ट्रात दंगली होणे ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
BJP Spokesperson Keshav Upadhye Criticizes Supriya Sule For Demanding Devendra Fadnavis To Resign As Home Minister
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App