‘’अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना सवाल!

Keshav Uppadye and Uddhav Thakrey

केशव उपाध्ये यांनी केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली आहे. याशिवाय आजही लोकांना तेच मुख्यमंत्री हवे असल्याचा सुरही काढला आहे. यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. BJP spokesperson Keshav Upadhye criticized Uddhav Thackeray

केशव उपाध्ये म्हणतात, ‘’राज्यातील मविआ सरकार जनतेचा कौल नाकारून बनवलं होतं. त्या सरकारचे मुख्यमंत्री नव्हे खुर्चीमंत्री होते ते आज म्हणतायत की आजही लोकांना तेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’

याचबरोबर ‘’तुम्हाला जनतेनी कधीच नाकारलं आहे. स्वतःचं काहीच कर्तृत्व नसलं की मग वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर सहानुभूतीची मतं मिळवावी लागतात. पण ते हे विसरलेत की सहानुभूती सुद्धा त्यालाच मिळते जो त्याच्या पात्र आहे.’’ असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.

‘’आमची बावनकुळं ही विचारांचे पाईक राहिलेले कुळं आहेत, तुमच्यासारखं…’’ बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात!

याशिवाय ‘’शिंदे फडणवीस सरकार एकत्रितपणे, जनहितार्थ कामं करत असताना खुर्चीवर बसून राहण्यासाठी धोका दिलेल्यांच्या पोटात दुखणारच. जनतेला सगळं दिसतंय, कळतंय. योग्य वेळी जनता माजी खुर्चीमंत्र्यांना त्यांच्या मनातले मुख्यमंत्री कोण आहेत ते दाखवणारच! तोवर त्यांचं स्वप्नरंजन चालू राहूदे!’’ असं म्हणत केशव उपाध्येंनी उद्धव  ठाकरेंवर टीका केली आहे.

BJP spokesperson Keshav Upadhye criticized Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात