कोणाचा बाजार उठवला गेला की त्याचा ‘उद्धव ठाकरे झाला’ म्हणायचं का?, असाही सवाल केशव उपाध्येंनी विचारला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघातात जो मरण पावतो तो “देवेंद्रवासी” होतो, असे लोक म्हणतात, अशी राजकीय टीका करून पवारांनी आपली पातळी घसरल्याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे. पवारांच्या या वक्तव्यांतर भाजपा आक्रमक झाली असून, पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. काल प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी पलटवार केल्यानंतर,आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही विविध प्रश्न उपस्थित करून निशाणा साधला आहे. BJP spokesperson Keshav Upadhye criticized Sharad Pawar
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणातात, ‘’अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी त्या मृतात्म्याची देवेंद्रवासी’ म्हणून चेष्टा करणे कितपत योग्य? शरद पवार, तुमच्याच शब्दांतून निकष लावायचा झाल्यास. कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याला ‘लवासा झाला’ असं म्हणायचं का?, कोणाचं उत्पन्न अचानक वाढलं तर त्याने ‘वांगी लावली’ म्हणायचं का?, कोणाचा विश्वासघात झाला की त्यांचा वसंतदादा झालाय असं म्हणायचं का?’’
याशिवाय, ‘’कोणासोबत धोका झाला तर त्यांना ‘सोनिया गांधी झाल्या’ असं म्हणायचं का?, कोणाचा बाजार उठवला गेला की त्याचा ‘उद्धव ठाकरे झाला’ म्हणायचं का?, कोणाची जाणीवपूर्वक घुसमट केली जात असेल तर त्याचा ‘अजित पवार झालाय’ असं म्हणायचं का?, आणि सर्वात महत्वाचं कोणी राजीनाम्याची हूल देऊन परत घेतला की, ‘शरद पवार झाला’ असं म्हणायचं का?’’ असे प्रश्न उपस्थित करत केशव उपाध्येंनी शरद पवारांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.
याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, ‘’समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत, वेळेची बचत होत आहे. देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. असे सगळे सर्वांना माहीत असूनही, देवेंद्र फडणवीसांचा व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी आज शरद पवार यांनी गाठली.’’
समृद्धी महामार्गावरील या अपघाताबद्दल मत मांडताना शरद पवारांना कळस गाठला असल्याचं सांगत “आमच्या गावात आता चर्चा अशी आहे, की एखादा दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.” हे शरद पवारांचं विधान त्यांनी सर्वांसमोर आणलं.
याशिवाय ‘’शरद पवार, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले. पवार गोवारी विसरले!, पवार मावळचा गोळीबार विसरले..!, पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले…!, हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले.’’ याची आठवणीही करून दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App