‘’आपण रोज सकाळी कॅमेरासमोर करता त्याला…’’ केशव उपाध्येंचा संजय राऊतांना टोला!

हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांनी केलं होतं ट्वीट 

प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्याचवेळी हसन मुश्रीफ यांचे सर्व समर्थक त्यांच्या घराबाहेर शक्तिप्रदर्शन करत होते. पण त्यानंतरही हसन मुश्रीफ यांना ईडीने पुढच्या तपासासाठी कायदेशीर समन्स बजावले आहे. या सगळ्य पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही यावरून एक ट्वीट केलं आहे. ज्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांना टोला लगावला.  आहे.  BJP spokesperson Keshav Upadhyay criticized MP Sanjay Raut

‘’मुश्रीफ यांच्या सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED ची कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा  डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. ED येथे गप्प का? उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांकडे पाठवीत आहे.’’ असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.


“काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी गरिबांचे जीवन सुलभ करण्यात व्यस्त आहे” – पंतप्रधान मोदींनी लगावला टोला!


त्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी म्हटले की ‘’अहो साहेब मागे असच गाजा वाजा करत सेनाभवन मध्ये प्रेस घेतली होती. नुसती हवा आणि प्रत्यक्षात सादर काय केल तर काहीच नाही. आपण रोज सकाळी कॅमेरासमोर करता त्याला पुरावे म्हणत नाहीत.’’

 

ईडीने गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे घातले. ईडीच्या पथकाने तब्बल साडेनऊ तास ईडीचे पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेतली. हे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडले. यानंतर हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी, १३मार्च रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरे जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांना याआधीदेखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. विशेष म्हणजे या छापेमारीच्या वेळी हसन मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते.

BJP spokesperson Keshav Upadhyay criticized MP Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात